Join us

स्टेण्टला जीवनावश्यक औषध म्हणून जाहीर करा -एफडीएचा अहवाल

By admin | Updated: May 20, 2015 02:03 IST

राज्यासह देशात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अनेकांना अ‍ॅन्जिओप्लास्टी करावी लागते.

मुंबई : राज्यासह देशात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अनेकांना अ‍ॅन्जिओप्लास्टी करावी लागते. हृदयांच्या धमन्यांमध्ये बसवण्यात येणाऱ्या स्टेण्टच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णांवर त्याचा आर्थिक बोजा पडत आहे. सध्या एक ते दोन लाख रुपयांपर्यंत स्टेण्टची किंमत आहे. प्रत्यक्षात या किमती ३० टक्के कमी होऊ शकतात. यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) महाराष्ट्राने नॅशनल फार्मास्युटिकल अ‍ॅथॉरिटीला (एनपीपीए) एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये स्टेण्टला जीवनावश्यक औषध म्हणून जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे़ हृदयातील धमन्यांत वापरण्यात येणाऱ्या स्टेण्टच्या किमतीवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. दोन लाखांपर्यंत स्टेण्ट विकले जात आहेत, ही अयोग्य बाब आहे. याचा आर्थिक फटका रुग्णांना सोसावा लागत आहे. यासाठी राज्यातील सहा वितरक आणि मुंबई, पुणे, नाशिक येथील रुग्णालयांची चौकशी करण्यात आली. यामध्ये स्टेण्टच्या किमती किती आहेत, आयात करण्यासाठी किती किंमत असते आणि वितरकांच्या किमती याचा आढावा एफडीएच्या भरारी पथकाने केला. या पथकात साहाय्यक आयुक्त फडतरे, साहाय्यक आयुक्त माधुरी पवार आणि ड्रग्ज इन्स्पेक्टर डी. सी. शेख होते. त्यांनी केलेल्या तपासानंतर एफडीएने एनपीपीला अहवाल सादर केल्याची माहिती आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली़ स्टेण्टला जीवनावश्यक औषध म्हणून जाहीर करावे, अशी मागणी अहवालात करण्यात आली आहे. स्टेण्ट तयार करणाऱ्या कंपन्यांना नफा किती मिळावा हे ठरवून द्यावे. जीवनावश्यक औषध म्हणून जाहीर केल्यास एमआरपीवर नियंत्रण येईल. देशात सगळीकडे स्टेण्टची किंमत एकच असावी, असा अहवाल सादर करण्यात आल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अहवालात काय आढळले...च्स्टेण्टची मूळ किंमत आयात करताना ३०० ते ७०० टक्के वाढवण्यात येतेच्नफ्यासाठी स्टेण्टच्या किमतीत १२० टक्के वाढ करण्यात येते. च्स्टेण्टमधून रुग्णालय आणि वितरकांना नफा १२५ टक्क्यांपर्यंत मिळतो.च्रुग्णालयाकडून स्टेण्टच्या किमतीत २५ टक्के वाढ करण्यात येते.