संतापलेल्या जया बच्चननी रिपोर्टरची कॉलर पकडली..
By admin | Published: May 8, 2014 02:54 PM2014-05-08T14:54:05+5:302014-05-08T16:07:12+5:30
एका स्टोअर लाँचच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अभिनेत्री जया बच्चन यांनी एका रिपोर्टरची कॉलर पकडल्याचे वृत्त आहे.
Next
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ८ - एका स्टोअर लाँचच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अभिनेत्री जया बच्चन यांनी एका रिपोर्टरची कॉलर पकडल्याचे वृत्त आहे. संबंधित रिपोर्टरने जया बच्चन यांना अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी एक प्रश्न विचारला असत्या त्या भडकल्या आणि हा प्रकार घडला.
अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठीक नसल्याच्या अनेक बातम्या सध्या मीडियात झळकत असून उपचारांसाठी ते अनेकवेळा रुग्णालयात गेल्याचेही वृत्त आहे. याच विषयावर एका रिपोर्टरने जया यांना प्रश्न विचारला असता त्यांचा रागाचा पारा चढला. ही जागा असे प्रश्न विचारण्यास उचित नसल्याचे सांगत त्यांनी उत्तर देणे टाळले. त्याच पत्रकाराने त्यांना दुसरा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्या वैतागल्या. मला फक्त कार्यक्रमाशी संबंधितच प्रश्न विचारा असे त्या म्हणाल्या व काही वेळातच तेथून निघून गेल्या.
यापूर्वीही अनेक ठिकाणी जया बच्चन यांच्या रागाचा पारा चढलेला दिसला. काही महिन्यांपूर्वी जया व ऐश्वर्या बच्चन एका कार्यक्रमाला गेल्या असताना काही फोटोग्राफर्सनी ऐश्वर्याला फोटोसाठी पोझ देण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी तिचा उल्लेख ' अॅश' असा केला असता भडकलेल्या जया बच्चननी फोटोग्राफर्सना खडे बोल सुनावले होते.