Join us  

आंग्रेकालीन सीमोल्लंघन

By admin | Published: October 03, 2014 10:39 PM

आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी येथील हिराकोट किल्ल्याशेजारील ‘घेरीया’या आपल्या निवासी परिसरात आजही अबाधित राखली आहे.

जयंत धुळप - अलिबाग
सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळातील सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याची परंपरा आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी येथील हिराकोट किल्ल्याशेजारील ‘घेरीया’या आपल्या निवासी परिसरात आजही अबाधित  राखली आहे. दरवर्षी या कार्यक्रमाकरिता सुमारे 1क्क् मराठा बांधव सहकुटुंब विजयादशमीच्या संध्याकाळी घेरीयामध्ये एकत्र येतात.
आंग्रेकालीन श्री राजराजेश्वरी देवीला  गा:हाणो
यंदाच्या विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी रघुजीराजे आंग्रे व मराठा बांधवांतील ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशाच्या गजरात मराठा बांधव सीमोल्लंघनास निघाले होते. हिराकोट किल्ल्याशेजारुन हिराकोट तलावावरुन तलावाशेजारील आंग्रेकालीन श्री राज राजेश्वरी देवीच्या मंदिरात या सर्वानी देवीस नमस्कार केला तर सर्वाना सुखसमृद्धी लाभण्याकरीता देवीस रघुजीराजे आंग्रे यांनी सर्व मराठा बांधवांच्यावतीने गा:हाणो घातले, आशीर्वाद मागितला.
वाजतगाजत सोने लुटून एकमेकांस शुभेच्छा
मिरवणूक वाजतगाजत पुन्हा घेरीयामध्ये आल्यावर तेथे आपटय़ांच्या पानांचे भारे सोने लुटण्याकरिता सज्ज ठेवण्यात आले होते. त्याचेही रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते विधिवत पूजन करुन मग सोने लुटण्याचा आनंद सर्वानी घेतला. लुटलेलेच सोने एकमेकाला देत आलिंगनासह सर्वानी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मराठा भगिनींनी देखील एकमेकींना सोने देवून अभिवादन केले.
सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची परंपरा आजही गरजेची
सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळात परिसरातील सर्वानी संघटित राहावे त्याकरिता एकत्र यावे या हेतूने सीमोल्लंघन व सोने लुटण्याची परंपरा सुरु झाली. 
आजच्या काळात भेटणो अशक्य होत चालले असल्याने, तीच परंपरा पुढे सुरु ठेवून मराठा बांधवांनी एकत्र यावे, भेटावे एकमेकांशी संवाद साधावा या हेतूने ही परंपरा पुन्हा एकदा सुरु केली. 
त्यास सर्व मराठा बांधवांनी अत्यंत उत्तम असा प्रतिसाद दिला असल्याने आता या आधुनिक काळातील पारंपरिक सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याच्या कार्यक्रमास एक आगळा आयाम प्राप्त होत असल्याची भावना रघुजीराजे आंग्रे यांनी यावेळी मराठा बांधवांशी बोलताना व्यक्त केली. 
 
हिराकोट तलावाजवळील श्री राज राजेश्वरी देवीस सुखसमृद्धीकरिता गा:हाणो घालताना रघुजीराजे आंग्रे व मराठा बांधव तर दुस:या छायाचित्रत सीमोल्लंघन करुन सोने लुटण्याकरिता रघुजीराजे आंग्रे आणि इतर मान्यवर.