Join us  

...आणि मालकाच्या पिशवीतली ९८ लाखांची रोकड चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 6:30 AM

दुकानातील जेवणाचा डबा आणि मिलिटरी रंगाची पिशवी घरी नेण्याची जबाबदारी मालकाने विश्वासू नोकरावर सोपवली. पिशवीतील सामानाबाबत नोकराला माहिती नव्हती.

मुंबई : दुकानातील जेवणाचा डबा आणि मिलिटरी रंगाची पिशवी घरी नेण्याची जबाबदारी मालकाने विश्वासू नोकरावर सोपवली. पिशवीतील सामानाबाबत नोकराला माहिती नव्हती. रात्रीच्या अंधारात तो पायीच मालकाच्या घराच्या दिशेने निघाला. मालकाच्या इमारतीतील पायºया चढत असतानाच एकाने त्याला धक्का दिला आणि हातातील पिशवी पळवली. नोकर त्याच्यामागे धावला. मात्र हाती काहीच लागले. मालकाला याबाबत सांगताच मालकाने त्या पिशवीत ९८ लाखांची रोकड असल्याचे सांगितले. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.पायधुनी येथील बनियान स्ट्रीट परिसरात व्यापारी नासीर खान यांचे इमिटेशन बिट्स शॉप आहे. येथील सिद्धार्थ मेन्शनमध्ये ते राहतात. गेल्या ४० वर्षांपासून राजेश्वरराव शंकर शास्त्री त्यांच्या दुकानात ग्राहकांना इमिटेशन बिट्स दाखविण्याचे काम करतो. त्याच्याशिवाय नईम आणि मेहबुब हे दोन नोकरही तेथे कामाला आहेत. बुधवारी नेहमीप्रमाणे ९ च्या सुमारास शास्त्रीने दुकान उघडले. खान ११ च्या सुमारास दुकानात आले. दिवसभराचे काम उरकून खान यांनी रात्री साडेआठच्या सुमारास जेवणाचा डबा, पिशवी घरी नेण्यास शास्त्रीला सांगितले. पिशवी घेऊन इमारतीपर्यंत पोहोचला. शास्त्री पुढे जाणार तोच एका तरुणाने त्याला धक्का देत हातातील बॅग हिसकावून पळ काढला.गुन्हे शाखेकडून तपासपायधुनी पोलिसांसह गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला आहे. यामागे ओळखीच्याच व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. शास्त्रीने दिलेला घटनाक्रम, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. ‘तो’ तरुण कोण होता? तो त्याच वेळेत कसा पोहोचला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत. शास्त्रीने केलेल्या वर्णनावरुन आरोपीचे छायाचित्र रेखाटण्यात आले आहे.