Join us

..तर मुंबईची वाहतूक होईल ठप्प

By admin | Updated: October 29, 2014 01:56 IST

वैध मापन शा यंत्रणोने सोमवारपासून सुरू केलेल्या कारवाईनंतर मुंबईतील 3क् ते 4क् सीएनजी पंप बंद करण्यात आले आहेत.

मुंबई :  वैध मापन शा यंत्रणोने सोमवारपासून सुरू केलेल्या कारवाईनंतर मुंबईतील 3क् ते 4क् सीएनजी पंप बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे इतर सीएनजी पंपांवर सीएनजीवर चालणा:या वाहनांच्या रांगा लागू लागल्या आहेत. अशीच परिस्थिती सुरू राहिल्यास गुरूवारनंतर शहरातील निम्म्याहून अधिक वाहतूक बंद पडेल. 
शिवाय त्याचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांना बसणार आहे. कारण मुंबईतील सर्व टॅक्सी या सीएनजीवर चालणा:या आहेत. तरी बेस्ट प्रशासनाच्या बसेसही सीएनजी पंपांवरच अवलंबून आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची भीती पेट्रोलपंप डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत 35 हजार टॅक्सी आणि बेस्टच्या 4 हजार 3क्क् बसेस आहेत. त्यातील सर्व टॅक्सी व बहुतेक बसेस या सीएनजीवर चालतात. बेस्ट बसेसच्या काही डेपोंमध्ये सीएनजी गॅस भरण्याची व्यवस्था असली, तरी टॅक्सी मात्र पूर्णपणो खाजगी सीएनजी पंपांवर अवलंबून आहेत. 
याशिवाय मोठय़ा संख्येने ट्रक, कार आणि इतर वाहने ही खाजगी पंपांवरच गॅस भरतात. सरासरी एका पंपावर 6 ते 7 हजार किलो सीएनजी गॅस भरला जातो. त्यामुळे 4क् पंप झाल्याने आधीच इतर पंपांवरील भार वाढला असून, गॅसचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यात सर्वच पंप बंद केल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन मुंबई ठप्प पडण्याची भीती आहे.
 
मुंबईतील 1क्7 सीएनजी पंपांवर कारवाई झाल्यानंतर राज्याचे नियंत्रक ठाणो, नवी मुंबई, आणि रायगड परिसरातील सीएनजी पंपांवर कारवाई करण्याची भीती शिंदे यांनी व्यक्त केली आहे. याठिकाणी एकूण 24 सीएनजी पंप असून त्यातील बहुतेक पंपांसाठी टाईप अप्रूव्हल प्रमाणपत्र घेतले नसल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
 
हवा एक महिन्याचा कालावधी
गेल्या 1क् ते 12 वर्षापासून प्रमाणपत्रविनाच हे सीएनजी पंप सुरू असल्याचे शिंदे यांनी मान्य केले. मात्र नवनियुक्त नियंत्रकांनी प्रमाणपत्र काढण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी देण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. नियंत्रक शहरातील परिस्थिती बिघडवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
 
..तर मुंबई बंद करणार !
प्रमाणपत्रसंदर्भात बुधवारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव दीपक कपूर यांच्यासोबत महानगर गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बैठक घेणार आहे. त्यात तोडगा न निघाल्यास सर्वच पेट्रोलपंप बंद करण्याचा इशारा शिंदेंनी दिला.