Join us  

नॅशनल पार्कमधील आनंद वाघाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 2:42 AM

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आनंद या नर वाघाचा गुरुवारी मृत्यू झाला. व्याघ्र सफारीत असणारा हा वाघ १० वर्षांचा होता. आनंद वाघाच्या खालच्या ओठावर कर्करोगाची गाठ निर्माण झाली होती.

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आनंद या नर वाघाचा गुरुवारी मृत्यू झाला. व्याघ्र सफारीत असणारा हा वाघ १० वर्षांचा होता. आनंद वाघाच्या खालच्या ओठावर कर्करोगाची गाठ निर्माण झाली होती. या गाठीमुळे मागील महिनाभर हा वाघ अत्यंत त्रस्त होता. मागील आठवड्याभरापासून त्याने अन्नग्रहणदेखील बंद केले होते. पशुवैद्यकांनी त्याला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले; परंतु तरीदेखील या वाघाचा मृत्यू झाला.काही दिवसांपर्ू्वी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ पथकाने या वाघाची तपासणी करून बायोप्सी केली होती. या तपासणीमध्ये त्याच्या ओठाजवळ कर्करोगाची अत्यंत घातक समजली जाणारी गाठ तयार झाली असल्याचे निष्पन्न झाले होते.मागील काही दिवसांपासून तो काहीच खात नसल्यामुळे त्याला आयव्ही फ्लूइड्स आणि सप्लिमेंट्स देण्यात येत होते. परंतु अखेर आनंद वाघाचा गुरुवारी पहाटे मृत्यूझाला.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मागील वर्षी यश वाघाचा मृत्यू झाला होता. आता या व्याघ्र सफारीत सुलतान हा नर वाघ व इतर चार वाघिणी आहेत.

टॅग्स :वाघमुंबई