Join us  

मुंबईत निघाली पर्यावरण जनजागृतीसाठी निघाली ‘इको वॉक ’ रॅली

By मनोहर कुंभेजकर | Published: June 05, 2023 5:04 PM

जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिना निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई-जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, दि. २, ३ व ४ जून २०२३ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग आणि बिट्स अँड बाईट्स यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय अनोखा ‘पर्यावरण इको उत्सव’ साजरा केला. ४ जून  रोजी, पर्यावरण जनजागृतीसाठी, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ‘इको वॉक ’ पर्यावरण रॅलीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान - मीनाताई ठाकरे पुतळ्यापासून निघालेली रॅली माई माळगेकर उद्यानात संपली. 

जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिना निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि,-२ व दि,३ जून रोजी इको वर्कशॉप्स मध्ये फेस पेंटिंग,घोषवाक्य निर्मिती,वृत्तपत्र व प्लास्टिक बाटल्यांमधून वेस्ट मॅनेजमेंटची निर्मिती  पथनाट्य आदीं पर्यावरण विषयक विविध उपक्रमांचे  सादरीकरण झाले.या तीन दिवसीय  ‘पर्यावरण इको उत्सवात’ अमूल्य योगदान दिल्याबद्दल इको वॉरियर्स यांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. 

या रॅलीमध्ये १०० नागरिक सहभागी झाले होते.त्यात रुपारेल एनएसएस युनिटचे विद्यार्थी आणि एमडी कॉलेजचे विद्यार्थी तसेच आवाहन पालक संघातील विशेष दिव्यांग मुले, काही ज्येष्ठ नागरिकांनी हरित आणि स्वच्छ पर्यावरण चळवळीला पाठिंबा देण्यासाठी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. रंगसंगती ग्रुपच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील पथनाट्याने आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली. पाठोपाठ इको फ्रेंडली पोशाखातील काही विशेष दिव्यांग मुलांच्या गटाने ही स्पर्धा सुरू झाली. आम्ही रस्त्यावरून प्लास्टिक गोळा केले आणि ते पुनर्वापर आणि रिसायकलिंगसाठी पालिकेला सुपूर्द केले. जी उत्तर विभागाचे घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता काझी इरफान अहमद व बिट्स अँड बाईट्सच्या अध्यक्ष विद्या बारस्कर यांनी ही माहिती दिली.

समाजाप्रती आपले योगदान देण्याच्या उद्देशाने सुरू केलेले बिट्स अँड बाईट्स( इन्फोटेनमेन्ट अँड अवेअरनेस डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म)  हे दादर स्थित एक डिजिटल माध्यम आहे. या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीच्या उद्देशाने नेहमी सामाजिक उपक्रम राबवले जातात. प्लॅस्टिक एकत्री करण या उपक्रमा अंतर्गत सोसायटी, सभागृहे, समुद्रकिनारे, मैदाने अशा अनेक ठिकाणचे प्लॅस्टिक एकत्र करून ते रिसायकलिंगसाठी पाठविले जाते अशी माहिती विद्या बारस्कर यांनी दिली.