Join us  

रुग्णवाहिका, बेडचीही वानवा; कोरोना झालेल्या परिचारिकेची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 12:53 AM

राणे यांनी या ट्विटसोबत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या त्या परिचारिकेचा रिपोर्टही दिला आहे. त्यानुसार ही परिचारिका २६ वर्षांची असून तिला कोरोना झाल्याचे ३१ मे रोजी उघड झाले होते.

मुंबई : कोरोनामध्ये रु ग्णसेवा करताना सध्या डॉक्टर, परिचारिका अन्य कर्मचारी कोरोनाबाधित होत असल्याने रु ग्णसेवेत अनेक अडचणी येत आहेत. मात्र पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांना किमान आपल्यालारु ग्णवाहिका आणि बेड उपलब्ध व्हावा ही अपेक्षा असताना परळच्या केईएम रुग्णालयामधील एका कोरोना पॉझिटिव्ह परिचारिकेला अ‍ॅम्ब्युलन्स आणि बेड नाकारण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे नितेश राणे यांनी टिष्ट्वटने समोर आणला.

राणे यांनी या ट्विटसोबत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या त्या परिचारिकेचा रिपोर्टही दिला आहे. त्यानुसार ही परिचारिका २६ वर्षांची असून तिला कोरोना झाल्याचे ३१ मे रोजी उघड झाले होते. अशा प्रकारची वागणूक एखाद्या परिचारिकेला मिळणार असेल तर त्यांनी जीवाशी खेळून कोरोनाशी लढा द्यावा तरी कशासाठी, असा सवालही राणे यांनी केला आहे. तसेच कोरोनाशी लढणाºया योद्ध्यांच्याच जीवाशी खेळ सुरू असल्याची दुर्दैवी घटना राणे यांच्या टिष्ट्वटने समोर आली.नितेश राणे यांनी टिष्ट्वटसोबत कोरोना झालेल्या त्या महिलेचा अहवालही जोडला. ही परिचारिका २६ वर्षांची आहे. ३१ मे रोजी तिचा कोरोनाचा अहवाल आला. अशा प्रकारची वागणूक एखाद्या परिचारिकेला मिळत असेल तर त्यांनी रूग्णसेवा का द्यावी, असा सवालही त्यांनी केला.