आयआयटीयन्सची रुग्णवाहिका सेवा ...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 05:32 PM2020-05-23T17:32:48+5:302020-05-23T17:41:01+5:30

मुंबईत कोरोनाबाधीतांच्या सेवेसाठी हेल्पनाऊ सर्व्हिसेस

Ambulance service of IIITians ...! | आयआयटीयन्सची रुग्णवाहिका सेवा ...!

आयआयटीयन्सची रुग्णवाहिका सेवा ...!

Next



मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी १२ तास वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आयआयटी नबॉम्बेच्या माजी विद्यार्थ्यानी एकत्र येऊन कोरोना रुग्णांना सहज रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी 'हेल्पनाऊ' ही विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे. हेल्पनाऊच्या ३५० हून अधिक रुग्णवाहिका २४ तास मुंबईत कार्यरत आहेत.

१ मे २०१९ रोजी आयआयटी बॉम्बेचे आयआयटीअन्सनी मुंबईत एखादी रुग्णवाहिका लवकरात लवकर आवश्यक त्या ठिकाणी पोहचावी या उद्देशाने ही सुविधा सुरु केली. 'हेल्पनाऊ' सुविधेचा लाभ घेण्यासाठी ८८९९८८९९५२ या क्रमांकावर रुग्णाने किंवा त्यांच्या नातेवाईकाने संपर्क साधल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये मुंबईमध्ये कोठेही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सेवा आठवड्याचे सातही दिवस २४ तास सुरू असणार आहे. त्यामुळे रुग्णांना रुग्णवाहिका सहज उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 'हेल्पनाऊ'कडून पुरवण्यात येणारी रुग्णवाहिका ही निर्जंतुक केलेली आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी असणार आहे. या सुविधेचा लाभ कोरोना रूग्णांसह, आरोग्य कर्मचारी, हॉस्पिटल, कोरोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा आणि सरकारी आस्थापने घेऊ शकतात, अशी माहिती आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांकडून देण्यात आली.

यापूर्वी आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यानी पूर्णतः भारतीय बनावटीची कोव्हीड १९ टेस्ट बस बनवली होती. या बसमध्ये असलेल्या जेनेटिक टेस्टिंग, कोणत्याही संपर्काशिवाय स्वब नमुने घेणे, टेलिरेडिओलॉजीची सुविधा आहेत. ही बस आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांकडून मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्यात आली असल्याने झोपडपट्टी परिसरात जाऊन रूग्णांची तपासणी करणे, त्यांचे स्वाब घेण्यास मदत होत आहे.

Web Title: Ambulance service of IIITians ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.