ठाणे : घरची गरिबी आणि शाळेत जाण्याचा कंटाळा यामुळे बुलडाण्यातून पळून आलेला बारावर्षीय मुलगा ठाण्यातील अंबरनाथ येथे सापडला. सुरुवातीला खोटे नाव सांगितल्याने त्याच्या पालकांचा शोध लागण्यास तीन महिन्यांचा विलंब झाल्याचे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने केलेल्या समुपदेशनातून समोर आले. नुकतेच त्याला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केल्याची माहिती पोलिसांनी दिली.बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील हा मुलगा सहावीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील सुरक्षारक्षक तर आई मिळेल ते काम करते. घरची गरिबी आणि शाळेचा कंटाळा यामुळे त्याने तीन महिन्यांपूर्वी घरून पळ काढून मुंबई गाठली. अंबरनाथ येथे फिरत असताना तो समतोल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या संपर्कात आला. मात्र, त्याने आपले खोटे नाव सांगितल्याने त्याचा शोध लागत नव्हता. संस्थेकडून याबाबत चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला माहिती देण्यात आली. त्यानुसार, युनिटने समुपदेशनाद्वारे खरे नाव शोधून पालकांशी संपर्क साधला.
बुलडाण्यातील मुलगा सापडला अंबरनाथला
By admin | Updated: July 3, 2015 22:30 IST