Join us  

गर्भपात करण्याची परवानगी द्या - सर्वोच्च न्यायालयात धाव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 6:50 AM

तेरा वर्षीय मुलीचे वजन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे, आई-बाबा तिला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी मुलगी साडेसहा महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.

मुंबई : तेरा वर्षीय मुलीचे वजन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे, आई-बाबा तिला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी मुलगी साडेसहा महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.चारकोप प्रकरणातील पीडित मुलगी ही २७ आठवड्यांची गर्भवती असल्याने, तिच्या तब्येतीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्वरित याविषयी निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे डॉ. निखिल दातार यांनी सांगितले आहे.थायरॉईडमुळे मुलीचे वजन वाढत आहे, असे पालकांना वाटले. त्यामुळे पालक तिला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांना मुलीची सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये मुलगी साडेसहा महिन्यांचीगर्भवती असल्याचे समजले. तिचे वय पाहता, तिला गर्भपातास परवानगी मिळावी, असे पालकांचे म्हणणेआहे.आरोपीला अटकमुलीवरील बलात्कारप्रकरणी पालकांनी चारकोप पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी २२ वर्षीय मुलाला अटक केली आहे. हा मुलगा पीडित मुलीच्या शेजारीच राहतो. आरोपी हा मुलीच्या वडिलांसह इडलीच्या दुकानात काम करतो. त्यामुळे तिच्या घरी त्याचे जाणे-येणे होते. त्याच दरम्यान या मुलीसोबत त्याने हा प्रकार केल्याचे समजते.