Join us  

सर्व सामाईक प्रवेश परीक्षा एकाच प्राधिकरणामार्फत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 1:06 AM

वैद्यकीय शिक्षणासह विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व सामाईक प्रवेश परीक्षा आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातून नियंत्रित केल्या जाणार आहेत.

मुंबई : वैद्यकीय शिक्षणासह विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व सामाईक प्रवेश परीक्षा आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातून नियंत्रित केल्या जाणार आहेत. मुंबईच्या फोर्ट भागात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आणि प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालय सुरू केले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, उच्च शिक्षण, आयुष, कला, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय या अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातून नियंत्रित केल्या जातील. विद्यार्थी आणि पालकांसाठीदेखील स्वतंत्र मदतकक्ष येथे तयार केला आहे. यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी, शाळा सोडल्याचे दाखल्यांची माहिती मिळेल.केंद्राच्या नॅशनल एप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर म्हणजेच ‘नाटा’मार्फत घेण्यात येणाºया आर्किटेक्चर परीक्षेत काही अडचणी आहेत, त्यासंदर्भात केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही तावडे यांनी सांगितले. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष तसेच प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालयांचे मुख्य कार्यालय दिनांक १ जूनपासून फोर्ट येथे स्थलांतरित झाले आहे. येथे स्वतंत्र प्रशासकीय कक्ष, वैधानिक कक्ष, माहिती तंत्रज्ञान कक्ष, लेखा कक्ष कार्यान्वित केले आहे.कौशल्यावर आधारित परीक्षा देण्याचे आवाहनदहावीचा निकाल लागला असून त्यात नापास झालेल्यांची महिनाभरात फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे, असे सांगून कलमापन चाचणीचा निकाल आणि पालकांचे समुपदेशन याचा विचार करून कौशल्य आधारित परीक्षा विद्यार्थ्यांनी देण्याचे आवाहनही तावडे यांनी या वेळी केले.

टॅग्स :परीक्षा