Ajit Pawar : मी कुणाला कळलोच नाही, धनंजय मुंडेंची अजित पवारांसाठी 'भावूक' कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 05:50 PM2021-07-22T17:50:37+5:302021-07-22T17:51:42+5:30

'बोले तैसा चाले' ही म्हण तंतोतंत लागू पडणारे, राज्याचे कृतिशील उपमुख्यमंत्री, आमचे नेते अजित पवार यांना जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे व आपले नेतृत्व कायम या महाराष्ट्राला लाभावे हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना!, असे ट्विट धनंजय मुंडेंनी केले आहे

Ajit Pawar : Dhananjay Munde's special emotional poem for Ajit Pawar on his birthday occasion | Ajit Pawar : मी कुणाला कळलोच नाही, धनंजय मुंडेंची अजित पवारांसाठी 'भावूक' कविता

Ajit Pawar : मी कुणाला कळलोच नाही, धनंजय मुंडेंची अजित पवारांसाठी 'भावूक' कविता

googlenewsNext
ठळक मुद्दे वाढदिवसादिनी अजित दादांबद्दल अनेक लेख वर्तमानपत्रात छापून येतील, पण मी कवितेतून दादांना शुभेच्छा देत आहे, असे धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. त्यानंतर, कवितेचं वाचनही केलंय.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 62 वाढदिवस आज साजरा होत आहे. दिग्गज राजकीय नेत्यांकडून अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर, गावागावातील कार्यकर्त्यांकडूनही सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या निरोगी आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांचे खास शिलेदार म्हणून ओळख असलेल्या धनंजय मुंडेंनी खास कविता म्हणून अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

'बोले तैसा चाले' ही म्हण तंतोतंत लागू पडणारे, राज्याचे कृतिशील उपमुख्यमंत्री, आमचे नेते अजित पवार यांना जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे व आपले नेतृत्व कायम या महाराष्ट्राला लाभावे हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना!, असे ट्विट धनंजय मुंडेंनी केले आहे. तसेच, आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्या व्हिडिओतून अजित पवार यांच्यासाठी एक कविताही मुंडेंनी म्हटली आहे. 

धनंजय मुडेंनी भावनिक शब्दांत कवितेच्या माध्यमांतून अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसादिनी अजित दादांबद्दल अनेक लेख वर्तमानपत्रात छापून येतील, पण मी कवितेतून दादांना शुभेच्छा देत आहे, असे धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. त्यानंतर, कवितेचं वाचनही केलंय. 

मित्र कोण आणि शत्रू कोण कधीच साधे कळले नाही
नाही भेटला कोण असा, ज्याने मला छळले नाही
सुगंध सारा वाटीत गेलो, मी कधीच दरवळलो नाही
ऋतू नाही असा कोणता, ज्यात मी होरपळलो नाही
केला सामना वादळाशी, त्याच्यापासून पळलो नाही
सामोरा गेलो संकटांना, त्यांना पाहून पळलो नाही
पचवून टाकले दु:ख सारे, कधीच मी हरळलो नाही
आले जीवनी सुख जरी, कधीच मी हुरळलो नाही 
कधी ना सोडली कास सत्याची, खोट्यात कधीच मळलो नाही 
रुसून राहिले अगदी माझ्या जवळचेच, मी कुणाला कळलोच नाही
धनंजय मुंडेंनी अशा भावनिक कवितेतून अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. या कवितेच्या कविचं नाव मी घेणार नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे. 

पुण्यात 1 रुपये लिटर दराने पेट्रोल
 
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील धानोरी येथे राष्ट्रवादी कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केवळ 1 रुपयात एक लिटर पेट्रोल देण्यात येत आहे. त्यामुळे, येथील ठिकाणावर वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेकांनी गर्दी केली आहे. हा उपक्रम जाणता राजा प्रतिष्ठान आणि शशिंकात टिंगरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. देशात पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी गाठली आहे. त्यातच, मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 107 रुपयांच्यापुढे गेला आहे. त्यामुळेच, 1 रुपयातं पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.
 

 

Web Title: Ajit Pawar : Dhananjay Munde's special emotional poem for Ajit Pawar on his birthday occasion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.