विमानतळ कोरोना तपासणी : वाद घालणाऱ्या प्रवाशांवर गुन्हा दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:07 AM2020-12-06T04:07:22+5:302020-12-06T04:07:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विमानतळावर विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रवाशांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी मोहिमेदरम्यान जे प्रवासी तपासणी न करता ...

Airport Corona Investigation: Passengers arguing will be charged | विमानतळ कोरोना तपासणी : वाद घालणाऱ्या प्रवाशांवर गुन्हा दाखल होणार

विमानतळ कोरोना तपासणी : वाद घालणाऱ्या प्रवाशांवर गुन्हा दाखल होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विमानतळावर विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रवाशांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी मोहिमेदरम्यान जे प्रवासी तपासणी न करता वाद घालत असतील अशा प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे. बाधित प्रवाशांपासून मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी घेतलेली ही काळजी आहे. या सर्व यंत्रणेचा महापालिका समन्वय ठेवत असून बाधित प्रवाशांना विलगीकरण करण्याचे निर्देश महापालिकेतर्फे देण्यात येत आहेत. प्रवाशांनी विमानतळ प्राधिकरणाला सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रवाशांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी मोहिमेचा शनिवारी आढावा घेतला गेला. परदेशातून, बाहेरील राज्यातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. प्रवाशांना कुठल्याही प्रकारे त्रास न होता येथील व्यवस्था अत्यंत चांगली आहे. प्रवाशांना फॉर्म भरण्यासाठी क्यूआर कोड दिला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना तपासणी करणे सुलभ होत आहे. येथील संपूर्ण कर्मचारी सहकार्य करीत आहेत. आरटीपीसीआर तपासणी करून आलेल्या प्रवाशांसाठी वेगळी रांग व तपासणी न केलेल्या प्रवाशांसाठी वेगळी रांग आहे. जेणेकरून प्रवाशांना विमानतळाबाहेर पडणे सुलभ होऊ शकेल.

Web Title: Airport Corona Investigation: Passengers arguing will be charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.