विमानतळ कार्गो मध्ये केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित सामग्रीचे कस्टम क्लिअरन्स व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:44 PM2020-04-10T17:44:28+5:302020-04-10T17:45:18+5:30

कस्टम क्लिअरिंग करणाऱ्या कमर्चाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त व अनावश्यक ताण पडत असून प्रशासनाने केवळ सध्याच्या परिस्थितीत आवश्यक असलेल्या वस्तुंची वाहतूक करण्यासाठी उपाययोजना आखाव्यात व इतर वस्तुंची क्लिअरिंग काही कालावधीनंतर करावी.

Airport cargo should only have custom clearance of material related to essential services | विमानतळ कार्गो मध्ये केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित सामग्रीचे कस्टम क्लिअरन्स व्हावे

विमानतळ कार्गो मध्ये केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित सामग्रीचे कस्टम क्लिअरन्स व्हावे

Next

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतातील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आलेली असली तरी हवाई मार्गे होणारी
मालवाहतूक सुरु आहे. त्यामुळे विमानतळावर सीमाशुल्क विभागात काम करणाऱ्या कमर्चाऱ्यांना मात्र कामावर हजर राहावे लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत
केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित वस्तूंची मालवाहतूक केली जाणे आवश्यक असताना अनेक कंपन्यांद्वारे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सेवेशी संबंधित
वस्तुंची मालवाहतूक केली जात आहे. त्यामुळे कस्टम क्लिअरिंग करणाऱ्या कमर्चाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त व अनावश्यक ताण पडत असून प्रशासनाने केवळ
सध्याच्या परिस्थितीत आवश्यक असलेल्या वस्तुंची वाहतूक करण्यासाठी उपाययोजना आखाव्यात व इतर वस्तुंची क्लिअरिंग काही कालावधीनंतर करावी अशी
मागणी पुढे येऊ लागली आहे.

कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक वस्तुंची प्राधान्याने मालवाहतूक करणे गरजेचे आहे. त्याशिवाय
विविध फार्मास्युटिकल्स उत्पादने, औषधे, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे, त्याच्याशी संबंधित वैद्यकीय उपकरणे, फळे, भाजीपाला,
पायाभूत क्षेत्राशी संबंधित सामग्री, वीज क्षेत्राशी संबंधित वस्तू, पेट्रो केमिकल्स, रिफायनरीज अशा विविध वस्तुंची मालवाहतूक केली जाणे गरजेचे आहे. मात्र याचा
लाभ घेऊन इतर सध्या जास्त महत्त्वाची बाब नसलेल्या वस्तुंची देखील मालवाहतूक केली जात असल्याने त्या वस्तुंचे कस्टम क्लिअरन्स करण्याचा ताण कर्मचाऱ्यांवर
येत आहे. सध्या अत्यावश्यक सेवा म्हणून ही सेवा सुरु असल्याने केवळ अत्यावश्यक वस्तुंची मालवाहतूक केली जावी व इतर सामग्री सध्याच्या काळात बाजूला
ठेवण्यात यावे अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनने केली आहे. फाऊंडेशनतर्फे निकोलस अल्मेडा व अॅड गॉडफ्रे पिमेंटा यांनी हे प्रकार त्वरित रोखावेत व कर्मचाऱ्यांवरील
ताण कमी करावा व केवळ अत्यावश्यक सेवेतील सामग्रीसाठी त्यांचा वापर करावा अशी मागणी केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाच्या आर्थिक हव्यासापोटी हे प्रकार होत असून हे प्रकार रोखून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे याकडे फाऊंडेशन ने लक्ष वेधले आहे.

या प्रकारामुळे विमानतळाच्या कार्गो विभागात कार्यरत असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून कामकरावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.सध्याच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील सामग्रीची वाहतूक केली जाणे गरजेचे असताना अत्यावश्यक सेवेत अंतर्भाव नसलेले मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गेमिंग उपकरणे, टेक्सटाईल्स अशा विविध सामग्रीची वाहतूक केली जात आहे. सहार येथील कार्गो संकुलात यासाठी आवश्यक प्रक्रिया केली जात आहे. ही सर्व कामे केली जात असताना कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजलेले आहेत, असा आरोप फाऊंडेशनने केला आहे. कार्गो संकुलातील सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून याबाबतची वस्तुस्थिती तपासता येईल, असा दावा करण्यात आला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन कठोरपणे करण्यात यावे असे आवाहन करत असताना दुसरीकडे विमानतळ प्रशासनाच्या या पवित्र्यामुळे शेकडो कामगारांचा जीव धोक्यात येत आहे. कामगारांचा जीव धोक्यात घालून असे काम करणे हे बेकायदा व अनैतिक असल्याचा आरोप फाऊंडेशनने केला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी व त्वरित हे प्रकार रोखावेत अशी मागणी करण्यात आली आहे. 

Web Title: Airport cargo should only have custom clearance of material related to essential services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.