Join us  

विमानतळावर आपत्कालीन वैद्यकीय मदतीने दोघे वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 4:27 AM

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन प्रवाशांना आणीबाणीच्या प्रसंगी वेळेवर आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळाल्याने या प्रवाशांना वाचवण्यात यश मिळाले आहे.

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन प्रवाशांना आणीबाणीच्या प्रसंगी वेळेवर आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळाल्याने या प्रवाशांना वाचवण्यात यश मिळाले आहे. टर्मिनल २ व टर्मिनल १ वर दोन वेगवेगळ््या प्रसंगात ही मदत पोचवण्यात विमातळावरील वैद्यकीय पथकाला यश आल्याने हे प्रवासी धोक्यातून बाहेर आले आहेत.मंगळवारी टर्मिनल २ वर घडलेल्या प्रसंगात अ‍ॅमस्टरडॅम येथून मुंबईत आलेल्या लॅन्सी डिसोजा या ६६ वर्षीय भारतीय प्रवाशाला प्रीपेड टॅक्सी काऊंटरजवळ गेल्यावर अत्यवस्थ वाटू लागले होते. त्यांची जीभ जड झाल्याने बोलता येणे अशक्य झाले होते, तसेच घामाघूम झाल्याने त्यांची शुध्द हरपण्याची वेळ आली होती. प्रीपेड टॅक्सी काऊंटरवरील कर्मचाऱ्यांनी त्वरित मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड च्या आपत्कालीन वैद्यकीय पथकाला याबाबत माहिती दिली. वैद्यकीय पथकाने त्वरित घटनास्थळी भेट देऊन डिसोजा यांची तपासणी सुरू केली. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रवाशाने तक्रार केल्यानंतर अवघ्या ३ मिनिटांत वैद्यकीय पथकाने प्रवाशाजवळ पोहोचून उपचार सुरू केले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना ह्रद्यविकाराचा झटका आल्याचे निष्पन्न झाले. त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. गुरूवारी सर्व उपचार झाल्यानंतर प्रवाशाला रूग्णालयातून घरी जाण्यासाठी सोडण्यात आले.दुसºया प्रसंगात, टर्मिनल १ वर बुधवारी महावीर जैन या ४६ वर्षीय प्रवाशाला अत्यवस्थ व अस्वस्थ वाटून छातीत दुखल्याने टर्मिनल १ वरील कर्मचाºयांनी त्वरित व वैद्यकीय पथकाला माहिती दिली. काही मिनिटांतच या पथकाने जैन यांची तपासणी करून तातडीने वैद्यकीय उपचार दिले. जैन यांना मधुमेहाचा त्रास असल्याने व विमान प्रवासात दोन तासांपासून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचा रक्तदाब व इतर तपासणी करण्यात आली व त्यांना ह्रद्यविकाराचा सौम्य झटका आल्याचे सिध्द आल्यानंंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. या प्रवाशांच्या कुटुंबियांनी विमानतळ प्रशासनाचे आभार मानले आहेत.

टॅग्स :मुंबई