Join us  

एसी लोकलची भाडेवाढ टळली, प्रवाशांना सहा महिन्यांसाठी दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 6:07 AM

महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला पश्चिम रेल्वेने तात्पुरत्या स्वरूपाचा दिलासा दिला आहे.

मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला पश्चिम रेल्वेने तात्पुरत्या स्वरूपाचा दिलासा दिला आहे. २५ जूनपासून लागू होणाºया एसी लोकलच्या भाडेवाढीला सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने गुरुवारी घेतला आहे.एसी लोकलच्या भाडेवाढीला सहा महिन्यांची मुदत देण्याची अधिसूचना रेल्वेने गुरुवारी प्रसिद्ध केली. अधिसूचनेनुसार सुरुवातीचे सहा महिने प्रथम दर्जाच्या तिकिटापेक्षा १.२ पट आणि सहा महिन्यांनतर १.३ पट तिकीटदर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, रेल्वे सूचना प्रणाली केंद्र (क्रिस) यांनी तिकीटदरांच्या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी वेळ मागितली आहे. यामुळे सध्या अस्तित्वात असलेले तिकीटदर २४ डिसेंबर २०१८पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माहितीला पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दुजोरा दिला आहे.नाताळच्या मुहूर्तावर देशातील पहिली वातानुकूलित लोकल चर्चगेट ते बोरीवली या स्थानकादरम्यान धावली. यानंतर या लोकलचा विस्तार विरारपर्यंत करण्यात आला. सोमवार ते शुक्रवार या काळात रोज चर्चगेट ते विरार एसी लोकलच्या १२ फेºया होतात. सहा महिन्यांत एसी लोकलचे उत्पन्न सात कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. मुंबईकर सध्या ‘आॅफर’ दरांमध्ये एसी लोकलने प्रवास करीत आहेत. २५ जून रोजी एसी लोकलला सहा महिने पूर्ण होतील.मध्य रेल्वेवरही हव्यातएसी लोकलमे २०१९ मध्ये ३८ वातानुकूलित रेक मुंबईत दाखल होणार आहेत. या एसी लोकलमध्ये सहा बोगी वातानुकूलित आणि सहा साधारण असतील. सध्या वातानुकूलित लोकलची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे होत आहे. मुंबईत येणाºया एसी लोकल मध्य रेल्वेवर चालवण्यात यावी, अशी मागणी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांच्याकडे केली आहे. मुंबईच्या प्रकल्पांचा आढावा नुकताच लोहाणी यांनी घेतला. यावेळी मध्य रेल्वेने ही मागणी केली होती.>महिना प्रवासी उत्पन्न(सरासरी)जानेवारी ७,४२८ २,९७,६७९फेब्रुवारी ९,६७३ ४,०१,४६१मार्च १३,०४४ ४,८९,८९६एप्रिल १४,७९८ ५,७९,५८३मे १६,०२६ ६,००,९१८

टॅग्स :लोकल