Join us  

कृषी संजीवनीसाठी जागतिक बँकेसोबत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 4:11 AM

विदर्भ आणि मराठवाड्यातील खारपाण पट्ट्यातील ५,१४९ गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाºया ‘नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पा’चा अंमलबजावणी आराखडा निश्चित करण्यात आला

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील खारपाण पट्ट्यातील ५,१४९ गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाºया ‘नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पा’चा अंमलबजावणी आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या करारनाम्याच्या मसुद्यावर शुक्रवारी जागतिक बँकेसोबत स्वाक्षºया केल्या.मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त भागावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. हवामानावर आधारित शेतीच्या माध्यमातून शेतकºयांचे उत्पन्न वाढवितानाच, योजनेत सहभागी गावातील जमिनींचे मृदासंधारण करण्यासाठी या प्रकल्पाची आखणी करण्यात येणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील १५ जिल्ह्यात पुढील ६ वर्षे हा प्रकल्प चालविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीच्या कर्जविषयक करार मसुदा, तसेच प्रकल्प अंमलबजावणी मसुद्यास अमतिम स्वरूप देण्यासाठी आज नवी दिल्ली येथे जागतिक बँकेच्या कार्यालयात बैठक झाली. या वेळी राज्य शासनाच्या वतीने वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आर.ए. राजीव, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, प्रकल्प संचालक विकास रस्तोगी उपस्थित होते, तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जागतिक बँकेच्या मुख्यालयातील अधिकारी बैठकीत सहभागी झाले. बैठकीत करारनाम्याचा मसुदा अंतिम झाल्यानंतर, केंद्र सरकारच्या वित्त विभागाचे अधिकारी विजयकुमार यांनी जागतिक बँंकेसोबतच्या करारावर स्वाक्षºया केल्या.जागतिक बँंकेच्या कार्यकारी संचालक मंडळाची २७ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, त्यात या कराराची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर, राज्याला सुमारे २,८०० कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. मार्चपासून प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे विजयकुमार यांनी सांगितले.