Join us  

वाझे आणि काझींपाठोपाठ विनायक शिंदेही सेवेतून बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सचिन वाझे आणि रिसाझुद्दीन काझी पाठोपाठ ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सचिन वाझे आणि रिसाझुद्दीन काझी पाठोपाठ ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या निलंबित पोलीस अंमलदार विनायक शिंदेला अखेर पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. पश्चिम परिमंडळाचे अप्पर आयुक्त यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) अंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करून सोमवारी ही कारवाई केली आहे.

लखनभैया बनावट चकमकप्रकरणात विनायक शिंदे हा दोषी आरोपी होता. त्यानंतर शिंदेला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शिंदेला गेल्या वर्षी मे महिन्यापासून पॅरोलवर कारागृहातून घरी सोडण्यात आले होते. अशात, हिरेन हत्या प्रकरणात शिंदेचा सहभाग उघड होताच, राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुकी नरेश गोर याच्यासह शिंदेला अटक केली होती. एनआयएने हा तपास आपल्या हाती घेतल्यानंतर या दोघांनाही ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर आता सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे.