Join us  

आफ्रिकन महिलेला सहा कोटींच्या कोकेनसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 4:18 AM

उरण : मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावर सोमवारी उतरलेल्या एका आफ्रिकन महिलेला सहा कोटींच्या कोकेनसह पकडण्यात आले. आठ दिवसांतील डीआरआयकडून ...

उरण : मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावर सोमवारी उतरलेल्या एका आफ्रिकन महिलेला सहा कोटींच्या कोकेनसह पकडण्यात आले. आठ दिवसांतील डीआरआयकडून लागोपाठ कोकेनचा साठा जप्तीची ही दुसरी घटना आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावर अडीस अबाबाहून दुबईमार्गे मुंबईकडे येणारी एलेना कासाकतीरा (४३) या संशयित महिलेला डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

अधिकाऱ्यांनी तिच्या सामानाची कसून तपासणी केली असता काळ्या कार्बन पेपरमध्ये लपेटलेली दोन पाकिटे आढळली. यामध्ये मोठ्या खुबीने लपवून ठेवण्यात आलेले एक किलो वजनाचे कोकेन आढळून आले. या सापडलेल्या कोकोनच्या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सहा कोटींच्या घरात आहेे. नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायद्यांतर्गत आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. मागील आठवड्यात पार्सलमध्ये भारतात पाठविण्यात आलेले २०२ ग्रॅम कोकेन डीआरआयने जप्त केले होते. आठ दिवसांतील कोकेन जप्त करण्याची ही दुसरी घटना आहे. त्या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती डीआरआय सूत्रांनी दिली.