Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या खांबाची जाहिराती, राजकीय बँनर्सनी रया गेली!

By रतींद्र नाईक | Updated: November 18, 2023 21:23 IST

विद्रुपीकरणामुळे एमएमआरडीए हैराण

मुंबई: शहर विद्रुप करणाऱ्या होर्डिंग्ज आणि बँनर्सनी आता मेट्रोचे खांबही बळकावले आहेत. शहरातून धावणाऱ्या मेट्रोच्या खांबांवर स्टिकर्स, जाहिराती आणि राजकिय पक्षांचे बँनर्स लावण्यात आले आहेत या  विद्रुपीकरणामुळे मेट्रोची रया गेली असून एमएमआरडीए पूर्ती हैराण झाली आहे.

बेकायदेशीर बँनर्स, पोस्टर्स, जाहिराती हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच मुंबईसह विविध महापालिकांना दिले आहेत. असे असतानाही शहरात बेकायदा बँनर्स होर्डिंग्ज वाढतच चालली आहेत. मुंबईतून धावणाऱ्या घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो १, दहिसर ते डी एन नगर मेट्रो २ अ, दहिसर ते अंधेरी मेट्रो ७ च्या खांबांवर बेकायदेशीर होर्डिंग्ज तसेच जाहिराती चिकटवण्यात आल्या आहेत.

सध्या दिवाळी निमित्ताने विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देणारे फलक लावल्याने एकेका खांबांवर बँनर्सची भाऊ गर्दी झाली आहे.बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणाऱ्यां विरोधात एमएमआरडीए कडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो मात्र सणासुदीच्या काळात या बँनर्स ची संख्या वाढल्याने एमएमआरडीए चे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :मुंबई