Join us  

आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:45 AM

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट महाविद्यालये आणि आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत.

मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट महाविद्यालये आणि आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. विद्यानगरी परिसरातील सर फिरोजशहा मेहता भवन येथे प्रजासत्ताकदिनी सकाळी १० वाजता या पुरस्काराचें वितरण होणार आहे.शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी शहरी विभागातून रामानंद आर्या डी. ए. व्ही महाविद्यालय, भांडूप आणि कांदिवली एज्युकेशन सोसायटीचे बी.के.श्रॉफ कला महाविद्यालय आणि एम.एच. श्रॉफ वाणिज्य महाविद्यालय, कांदिवली आणि संस्कार सर्जन एज्युकेशन सोसायटीचे धिरजलाल तलकचंद संकलचंद शहा वाणिज्य महाविद्यालय मालाड या महाविद्यालयांची उत्कृष्ट महाविद्यालये म्हणून निवड करण्यात आली आहे. तर ग्रामीण विभागातून खेड जिल्हा रत्नागिरी येथील सहजीवन शिक्षण संस्थेचे श्रीमती इंदिरा महादेव बेहरे आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय जवाहर जिल्हा पालघर या महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे.मुंबई विद्यापीठाचे आदर्श महाविद्यालय आणि आदर्श शिक्षक हे पुरस्कार ग्रामीण आणि शहरी विभाग या वर्गवारीतून देण्यात येतात.>या ठरल्या सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका...शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी शहरी विभागातून वाणिज्य विभागातील डॉ. संगिता पवार, यांची निवड झाली आहे तर ग्रामीण विभागातून डॉ. यस्मिन खलिद आवटे, र.प. गोगटे कला व विज्ञान आणि र.वि. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालय, रत्नागिरी यांची निवड करण्यात आली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी विद्यापीठ विभागातून डॉ. उर्वशी पंड्या, गुजराती विभाग यांची निवड झाली असून, ग्रामीण विभागातून डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, गोगटे महाविद्यालय रत्नागिरी आणि शहरी विभागातून प्रा. डॉ. झरिन पी. भठाने, भारतीय विद्या भवन्स महाविद्यालय अंधेरी यांची निवड करण्यात आली आहे.