Join us

फरार फायनान्सरच आॅडीचा मालक

By admin | Updated: March 25, 2017 01:51 IST

खेरवाडीत सुमारे दोन कोटींच्या जुन्या नोटा बुधवारी हस्तगत करण्यात आल्या होत्या. या नोटा ज्या आॅडीमधून आणण्यात आल्या तिचा मालक सध्या फरार

मुंबई : खेरवाडीत सुमारे दोन कोटींच्या जुन्या नोटा बुधवारी हस्तगत करण्यात आल्या होत्या. या नोटा ज्या आॅडीमधून आणण्यात आल्या तिचा मालक सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खेरवाडी पोलिसांनी २ कोटी १ लाख ६२ हजार ५०० रुपयांच्या हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांसह सफेद रंगाची आॅडी कारही हस्तगत केली. हे पैसे अंधेरीतील फायनान्स कंपनीचा प्रमुख राजेश धानुकर याच्या मालकीचे आहेत. तो सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. १६ मार्च रोजी या प्रकरणी विनोद देसाई, सचिन सुमरिया, इमताज मुलानी आणि सुरेश कुंभार या चौघांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)