actor vivek oberoi apologies for sharing controversial meme on aishwarya rai bachchan | वादग्रस्त ट्विटबद्दल विवेक ओबेरॉयची माफी; मीमही केलं डिलीट
वादग्रस्त ट्विटबद्दल विवेक ओबेरॉयची माफी; मीमही केलं डिलीट

मुंबई : एक्झिट पोलवरुन अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनवरील आक्षेपार्ह मीम ट्विटरवर पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉय वादाच्या भोवऱ्यात सापडला. याप्रकरणी विवेक ओबेरॉयने माफी मागितली असून पोस्ट करण्यात आलेले आक्षेपार्ह मीमचे ट्विट सुद्धा डिलीट केले आहे.   

विवेक ओबेरॉयने दोनवेळा ट्विट केले आहे. यातील पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'कधी-कधी कोणाला पहिल्यांदा जे मजेशीर आणि निरपराध वाटते. ते दुसऱ्यांना बहुतेक वाटत नाही. मी गेली दहा वर्षे 2000 हून अधिक असहाय्य मुलींच्या सशक्तिकरणासाठी घालविली आहेत. मी कधीही कोणत्याही महिलेचा अपमान करण्यासंदर्भात विचार करु शकत नाही.'


त्यानंतर, दुसऱ्या ट्विटमध्ये विवेक ओबेरॉयने म्हटले आहे, 'जर मीमला दिलेल्या रिप्लायवरुन एकाही महिलेला ठेच पोहचली असेल, तर यामध्ये सुधारणा गरजेची आहे. माफी मागतो. ट्विट डिलीट केले आहे.'  


दरम्यान, एग्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर विवेक ओबेरॉयने एका मीमच्या माध्यमातून ऐश्वर्या राय बच्चनचा भूतकाळसमोर आणला होता. या मीममध्ये तीन फोटो होते. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय बच्चनचा अभिनेता सलमान खानसोबत असलेला फोटो होता. त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले होते. तर दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय बच्चन असा फोटो होता. त्या फोटोत एग्झिट पोल असे लिहिले होते. त्यानंतर तिसऱ्या फोटोत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो होता.त्या फोटोखाली रिझल्ट असे लिहिले होते. असे हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र त्यांनी ते ट्विटवर शेअर करत आपल्याला आवडल्याची प्रतिक्रिया दिली होती. 
याशिवाय, याप्रकरणी एका महिलेचा अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्य तसेच केंद्रीय महिला आयोगाने याबाबत विवेक ओबेरॉयकडे स्पष्टीकरण मागितले होते. 
 


Web Title: actor vivek oberoi apologies for sharing controversial meme on aishwarya rai bachchan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.