Join us  

‘बाबूजी धीरे चलना’सारख्या गाण्याला पडद्यावर अजरामर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 5:37 AM

‘बाबूजी धीरे चलना’सारख्या गाण्याला पडद्यावर अजरामर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री शकिला (८२) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले.

मुंबई : ‘बाबूजी धीरे चलना’सारख्या गाण्याला पडद्यावर अजरामर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री शकिला (८२) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले.पन्नास व साठच्या दशकात निरागस चेहºयाची अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. गुरुदत्त यांच्या ‘आर-पार’, ‘सीआयडी’ या गाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केले होते. शम्मी कपूर यांच्यासोबत त्यांनी ‘चायना टाऊन’ चित्रपटात काम केले होते. आपल्या चौदा वर्षांच्या कारकिर्दीत शकिला यांनी जवळपास ५० चित्रपटांमध्ये काम केले. लग्नानंतर त्या इंग्लडमध्ये स्थायिक झाल्या होत्या. त्यांना मिनाज नावाची मुलगी होती. मात्र, १९९१ साली मुलीचे निधन झाल्यानंतर त्या भारतात परतल्या.