Join us

अभिनेता करण मेहराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:06 IST

पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाईअभिनेता करण मेहराला अटकगाेरेगाव पोलिसांची कारवाई; पत्नीने केली मारहाणीची तक्रारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई ...

पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई

अभिनेता करण मेहराला अटक

गाेरेगाव पोलिसांची कारवाई; पत्नीने केली मारहाणीची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत नैतिकची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता करण मेहराला सोमवारी रात्री गोरेगाव पोलिसांनी अटक केली. पत्नीला मारहाण केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अभिनेता करण आणि निशा रावल २०१२ रोजी विवाह बंधनात अडकले. त्यांना ४ वर्षांचा मुलगा आहे. सोमवारी करणने आपल्यासाेबत भांडण करून मारहाण केल्याची तक्रार निशाने सोमवारी रात्री गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत, त्याला अटक केली.

करण मेहरा हा हिंदी टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेने त्याला लाेकप्रियता मिळवून दिली. याशिवाय हिंदी बिग बॉस स्पर्धेतही त्याने सहभाग घेतला होता.

..........................................