Join us  

फटका गँगमध्ये अल्पवयीन मुले सक्रिय; हातावर फटका मारून मोबाइलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:35 AM

रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाइल पळविणाऱ्या टोळीमध्ये अल्पवयीन मुले सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रेल्वेच्या दारात उभे राहून प्रवास करणा-या प्रवाशांच्या हातावर फटका मारून, त्यांच्या मोबाइलची चोरी करणा-या सराईत अल्पवयीन मुलाला रविवारी वांद्रे रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाइल पळविणाऱ्या टोळीमध्ये अल्पवयीन मुले सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रेल्वेच्या दारात उभे राहून प्रवास करणाºया प्रवाशांच्या हातावर फटका मारून, त्यांच्या मोबाइलची चोरी करणाºया सराईत अल्पवयीन मुलाला रविवारी वांद्रे रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.दिवा येथे वास्तव्यास असलेला सिद्धांत जाधव हा १२ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकातून फलाट क्रमांक ३ येथून बोरीवलीच्या दिशेला जाणाºया लोकलमधून प्रवास करत होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास लोकल वांद्रे स्थानकातून बोरीवली दिशेसाठी निघाली. तो रेल्वेच्या दारातच उभा होता. वांद्रे स्थानकातील फलाट ३चा शेवट येताच सिद्धांतच्या हातावर जोरदार फटका बसल्याने, त्याच्या हातातील मोबाइल रुळावर पडला. मोबाइल हरवल्या प्रकरणी त्याने १३ एप्रिलला वांद्रे रेल्वे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील रशिद कंपाउंडमध्ये राहणाºया अल्पवयीन मुलाला या प्रकरणी अटक करण्यात आली. सदर अल्पवयीन मुलावर यापूर्वीदेखील रेल्वे स्थानकात चार मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती वांद्रे रेल्वे पोलिसांनी दिली. फटका गँगमध्ये अल्पवयीन मुले सक्रिय असल्याचा संशयही पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.अटकेनंतर बालसुधारगृहातून पळालासराईत अल्पवयीन चोराला वांद्रे रेल्वे पोलिसांनी रविवारी अटक करून, उमरखाडी येथील बालसुधारगृहात पाठवले होते. तथापि, सोमवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास त्या मुलाने सर्वांची नजर चुकवत बालसुधारगृहाची भिंत ओलांडून पळ काढला. त्याच्या शोधासाठी दोन विशेष पथके पाठविण्यात आल्याची माहिती वांद्रे रेल्वे पोलिसांनी दिली.

टॅग्स :मुंबई लोकल