आरोपी रुग्णांशीही उद्धटपणे वागत होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 02:41 AM2019-09-04T02:41:51+5:302019-09-04T02:42:16+5:30

पायल तडवी आत्महत्या प्रकरण : उच्च न्यायालयाने नोंदविले निरीक्षण

The accused was also rude to the patients in payal tadvi case | आरोपी रुग्णांशीही उद्धटपणे वागत होते

आरोपी रुग्णांशीही उद्धटपणे वागत होते

Next

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या केवळ त्यांच्या सहकाऱ्यांशी किंवा कनिष्ठ सहकाऱ्यांशीच उद्धटपणे वागत नव्हत्या, तर रुग्णांशीही उद्धटपणे वागत. बाळाला जन्म देण्यासाठी आलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील महिलांशी फटकून वागत. यावरून या तिन्ही डॉक्टर असंवेदनशील होत्या, हे त्यांच्या वर्तनावरून स्पष्ट होते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने ९ आॅगस्ट रोजी या तिघींची जामिनावर सुटका करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशात नोंदविले.
उच्च न्यायालयाने हेमा आहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवालची ९ आॅगस्टला सशर्त जामिनावर सुटका केली. त्या आदेशात न्या. साधना जाधव यांनी वरील निरीक्षण नोंदविले.

आरोपींचा स्वभाव आणि वर्तनाविषयीची माहिती सर्व साक्षीदारांनी तपास यंत्रणेला दिली. त्यात चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयांचाही समावेश आहे. त्यातील एका साक्षीदाराने दिलेल्या साक्षीनुसार, एका गरोदर महिलेने आपल्या पोटात बाळाची हालचाल होत नसल्याचे डॉ. हेमा आहुजाला लेबर रूममध्ये सांगितले. त्यावर हेमाने त्या रुग्णाला बाळ गर्भाशयातच मृत्यू पावले असेल, असे सांगितले. प्रसूतीसाठी आलेल्या एका तरुण महिलेला डॉ. हेमाने दिलेली वागणूक ही अत्यंत असंवेदनशील होती. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आरोपी सहानुभूती दाखवत नव्हत्या किंवा संवेदनशीलही नव्हत्या. त्यांच्याशी प्रेमाचे चार शब्दही बोलत नव्हत्या. आरोपींविरोधात त्यांच्या ज्येष्ठ सहकाºयांकडे रुग्णही तक्रार करत. यावरून आरोपींचा व्यवसायिक दृष्टिकोन समजतो. वैद्यकीय व्यवसाय हा उदात्त व्यवसाय आहे. गरोदर महिला तपासणीसाठी रुग्णालयात येत, तेव्हा आरोपी त्यांच्याशी अत्यंत असंवेदनशीलपणे वागत, हे तपासदरम्यान उघडकीस आले आहे. रुग्णालयात काम करणाºया तीन परिचरिकांनीही आरोपी सर्वांशी उद्धटपणे वागत असल्याचे साक्षीत सांगितले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
कर्मचाºयांशी संवाद साधताना त्या त्यांचा अपमान करत. उपचारासाठी येणाºया महिला निम्न आर्थिक स्तरातील आहेत, याचा आरोपींना विसर पडला. त्यामुळे त्या रुग्णांचा अपमान करत. ज्येष्ठ डॉक्टर म्हणून त्या त्यांच्या सहकाºयाच्या भावनांप्रती असंवेदनशीलता दाखवत. त्यांनी या वातावरणाशी जमवून न घेऊ शकणाºया व दबावतंत्राशी प्रतिकार करू न शकणाºया पायल तडवीच्या घाबरट स्वभावाचा फायदा घेतला, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. पायल शिकताना कामाचा तणाव सहन करू शकली नाही. आरोपी केवळ तिच्यावर जबाबदारी सोपवत होत्या. मात्र, तिचा छळ करण्याचा करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळताना म्हटले की, कनिष्ठ डॉक्टरांना कसे हाताळायला हवे, हा प्रश्न आहे. आपण आपल्या घरी आहोत, अशी वागणूक ज्येष्ठ डॉक्टरांनी कनिष्ठ डॉक्टरांना द्यायला हवी.

‘निर्णय विशेष न्यायालय घेईल’
सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे की, आरोपींची जामिनावर सुटका करताना आरोपी तपासासाठी सहकार्य करतो की नाही किंवा तपास पूर्ण झाला की नाही, हे न्यायालयांनी विचारात घ्यावे. त्यानुसार, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. दोषारोपपत्र दाखल केले आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवून झाले आहेत. आरोप या आयपीसी कलम ३०२, ३०७ किंवा दहशतवादी नाहीत. त्यांनी पायलला आत्महत्या करण्यास भाग पाडले का, याबाबत विशेष न्यायालय निर्णय घेईल.

Web Title: The accused was also rude to the patients in payal tadvi case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.