भांडुपमध्ये शिक्षिकेची हत्या करत आरोपीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 01:19 AM2020-01-14T01:19:37+5:302020-01-14T01:19:41+5:30

टँक रोड परिसरातील वक्रतुंड पॅलेसमध्ये यास्मिता मिलिंद साळुंखे (३७) या राहत होत्या. त्या शिक्षिका असून, त्यांचे पती पालिका कंत्राटदार आहेत

Accused murdered teacher in Bhandup | भांडुपमध्ये शिक्षिकेची हत्या करत आरोपीची आत्महत्या

भांडुपमध्ये शिक्षिकेची हत्या करत आरोपीची आत्महत्या

Next

मुंबई : भांडुपच्या टॅक रोड परिसरातील एका इमारतीच्या पार्किंग लॉटमध्येच शिक्षिकेच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याचे खळबळ उडाली. सीसीटीव्हीमध्ये हा घटनाक्रम कैद झाला. त्याच आधारे आरोपीचा शोध सुरु असताना, रात्री पावणेआठच्या सुमारास आरोपीनेही नैराश्येतून राहत्या इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत.

टँक रोड परिसरातील वक्रतुंड पॅलेसमध्ये यास्मिता मिलिंद साळुंखे (३७) या राहत होत्या. त्या शिक्षिका असून, त्यांचे पती पालिका कंत्राटदार आहेत. सोमवारी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास इमारतीच्या पार्किंगमध्ये असताना फोर्ड कारमधील व्यक्तीने यास्मिता यांच्या डोक्यात हातोडीने हल्ला चढवत कारसहित पळ काढला. स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला. सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये चेहरा कैद झाला. त्याचे नाव किशोर सावंत (४५) असून तो इस्टेट एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस किशोरचा शोध घेत असताना, रात्री पावणे आठच्या सुमारास किशोरने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. किशोर हा भांडुपच्या कल्पतरू इमारतीच्या डी विंगमध्ये भाड्याने राहण्यास होता. घटनास्थळावरून कुठल्याही स्वरूपाची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हत्येमागचे गूढ कायम असून या प्रकरणी भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांकडे अधिक चौकशी सुरू आहे. किशोरच्या आत्महत्येच्या वृत्ताला सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कदम यांनी दुजोरा दिला.

Web Title: Accused murdered teacher in Bhandup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.