घाटकोपर पोलिसांची कारवाई
घाटकोपर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तरप्रदेश येथे गोळीबार करून मुंबईत आलेल्या आरोपीला घाटकोपर पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. सेहबाज उबेदूर रहमान खान (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकड़ून रिव्हॉल्वरही जप्त करण्यात आली आहे.
घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, पोलीस शिपाई पाटील यांना खान हा सुंदरबाग परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे पथकाने पाळत ठेवली. त्याच्या अंगझडतीत एक गावठी रिव्हॉल्वर मिळून आले. रिव्हॉल्वर हस्तगत करत, आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत उत्तरप्रदेश येथील राणीगंज पोलीस ठाण्यात गोळीबाराच्या गुह्यांत तो पाहिजे आरोपी असल्याचे समोर आले. त्याने फायरिंग करून तीन लोकांना जखमी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याबाबत संबंधित पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.