Join us

गायक यश वडालीवर विनयभंगाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:19 IST

गायक यश वडालीवर एका तरुणीने विनयभंगाचा आरोप केला आहे. याप्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : गायक यश वडालीवर एका तरुणीने विनयभंगाचा आरोप केला आहे. याप्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी पीडित तरुणी नेहा (नावात बदल) ही जुहूच्या एका हॉटेलमध्ये गेली होती. त्या ठिकाणी वडाली आणि त्याचे मित्रदेखील होते. त्यानंतर, पीडित तरुणी ही काही परिचितांसोबत बांगुरनगर परिसरात असलेल्या एका मित्राच्या घरी गेले. त्यांच्या पाठोपाठ वडाली आणि त्याचे मित्रदेखील या ठिकाणी गेले. त्या वेळी पीडित तरुणीने वडालीला गाणे गाण्याचा आग्रह केला. त्यावरून, वडालीने भांडण सुरू करत नेहाला शिवीगाळ केली, तसेच त्याने तिच्या शर्टची कॉलर धरली आणि तिला पुढे खेचून मागे ढकलले. त्याचप्रमाणे, त्याची समजूत काढण्यासाठी पीडित तरुणी गेल्यानंतरदेखील, त्याने नेहाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली, असा आरोप तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. तेव्हा नेहाने या प्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.