मेट्रो कर्मचाऱ्याचा कांदिवलीत अपघाती मृत्यू; गर्डर ठेवताना झाली दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 02:53 AM2019-11-02T02:53:16+5:302019-11-02T02:53:28+5:30

ही घटना दुर्दैवी असून मेट्रोच्या कामामध्ये अशा प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Accidental death of Metro employee in Kandivli; There was an accident while keeping the girder | मेट्रो कर्मचाऱ्याचा कांदिवलीत अपघाती मृत्यू; गर्डर ठेवताना झाली दुर्घटना

मेट्रो कर्मचाऱ्याचा कांदिवलीत अपघाती मृत्यू; गर्डर ठेवताना झाली दुर्घटना

Next

मुंबई :कांदिवलीमध्ये मेट्रो मार्गासाठी गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात वाहन चालक असलेल्या मेट्रो कर्मचाºयाचा मृत्यू झाला. इरफान शेख असे त्यांचे नाव आहे. कांदिवली पूर्व येथील समतानगर पोलीस ठाण्याजवळील मेट्रो २ अ मार्गिकेवर शुक्रवारी पहाटे यू-गर्डर टाकण्याचे काम सुरू होते. या वेळी गर्डर पडल्यामुळे शेख यांना नाहक जीवाला मुकावे लागले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अरमान अहमद हा मेट्रोच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराचा कर्मचारी होता. गर्डर ठेवत असताना रोलिंग गीअर मशीन तुटल्यामुळे हा अपघात झाला. हा गर्डर थेट वॉर्निंग कारवर कोसळल्याने या कारमध्ये असणाºया या कर्मचाºयाचा मृत्यू झाला. गर्डरचे वजन सुमारे शंभर टन इतके असते. या अपघातामध्ये गर्डर थेट वाहनावर कोसळला. जे. कुमार या कंत्राटदाराला मेट्रो पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे.

ही घटना दुर्दैवी असून मेट्रोच्या कामामध्ये अशा प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच ही दुर्दैवी घटना असून अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कर्मचाºयाप्रति शोक व्यक्त करीत असून भविष्यात सर्वच कंत्राटदार योग्य ती काळजी घेतील, अशी अपेक्षा एमएमआरडीएचे प्रवक्ते दिलीप कवठकर यांनी व्यक्त केली.

चालकावर गुन्हा दाखल
इरफान शेख हा हायड्रोलीकचा डायरेक्शन देणारा होता. त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला, तर अपघातप्रकरणी अनोळखी चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तो सध्या पसार आहे, अशी माहिती समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू कसबे यांनी दिली.

Web Title: Accidental death of Metro employee in Kandivli; There was an accident while keeping the girder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो