Join us  

मध्य रेल्वेवर लवकरच धावणार एसी लोकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:31 AM

समितीची बैठक : प्रवाशांना अत्याधुनिक सेवा पुरविणार

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला-विद्याविहार या स्थानकांदरम्यान पादचारी पूल, मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्स्प्रेस, हार्बर मार्गावरील पनवेल ते गोरेगाव लोकल सेवा आणि एसी लोकल केंद्रस्थानी ठेवत रेल्वे प्रवाशांना आधुनिक सेवा-सुविधा पुरविण्यावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत भर देण्यात आला.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला-विद्याविहार या स्थानकांदरम्यान पादचारी पूल उभारण्यास मध्य रेल्वे प्रशासन सकारात्मक असून याबाबत विचारपूर्वक निर्णय घेऊन प्रवाशांना सुविधा पुरविण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाने दिले. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला-विद्याविहार पादचारी पूल बांधण्यासाठी अपुरी जागा असल्याने बांधकाम होणे अवघड आहे. मात्र नियोजनबद्ध काम केल्यास पादचारी पूल उभारण्यास यश येईल, असे म्हणणे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मांडले. टिळक नगर ते लोकमान्य टिळक टर्मिनस जाणाºया रस्त्यादरम्यान रेल्वे वेळापत्रक दर्शविणारे इंडिकेटर बसविणे शक्य असल्यास ही सुविधाही उपलब्ध करण्यात येईल. टिळक टर्मिनसवरून सुटणारी मेल, एक्स्प्रेसमध्ये आरक्षित जागा उपलब्ध झाल्यावर इंडिकेटरवर दर्शविण्यात यावे, अशी मागणी बैठकीत सल्लागार समितीकडून करण्यात आली. यावर सीआरआयएस (क्रिस)च्या साहाय्याने या मागणीवर काम करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्स्प्रेस १९ जानेवारी सुरू करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी ही उत्तम सुविधा असेल. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस गाठावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांचा अधिक वेळ आणि पैसा खर्च होत होता. आता मध्य रेल्वे मार्गावरून राजधानी एक्स्प्रेस सुरू झाल्यावर मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव येथील प्रवाशांना दिल्ली गाठण्यास सुलभ होईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. हार्बर मार्गावरील पनवेल ते गोरेगाव लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. पनवेल-गोरेगाव या प्रकल्पासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाचे साहाय्य घेऊन काम केले जाणार आहे. गोरेगाव येथील मूलभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. पनवेल-गोरेगाव लोकल सुरू झाल्यास प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे येथे जादा लोकल फेºया लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे, यावर चर्चा करण्यात आली.मध्य मार्गावर राजधानी एक्स्प्रेसमध्य रेल्वे मार्गावरील राजधानी एक्स्प्रेस, हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत विस्तार, नेरळ-बेलापूर-खारकोपर, एसी लोकल हे प्रमुख मुद्दे मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत मांडण्यात आले. या मुद्द्यांवर मध्य रेल्वेची भूमिका सकारात्मक असून योग्य पावले उचलण्यात येणार आहेत.

अशाही काही अडचणीच्खारकोपर ते सीएसएमटी लोकल सेवा सुरू करण्यास रेल्वे प्रशासन सकारात्मक नाही. कारण हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल आणि नेरळ/बेलापूर, खारकोपर वेगवेगळे कॉरिडोर आहेत. सध्या यामध्ये कोणतीही जोडणी केलेली नाही.च्सीएसएमटी ते खारकोपर लोकल फेरी चालविणे सध्या उचित नसल्याचे सांगण्यात आले आहे. कुर्ला-ठाणे-वाशी-कुर्ला रिंग रुट लोकल सेवा सुरू होणे सध्यातरी शक्य नाही. कारण या लोकल सेवेमुळे इतर लोकल सेवेवर परिणाम होईल, अशी स्पष्टीकरण मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी दिले. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची निराशा होणार आहे़

टॅग्स :लोकल