Join us  

पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल पूर्वसूचनेशिवाय रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 6:52 AM

पश्चिम रेल्वेवरील सकाळच्या वेळेतील वातानुकूलित लोकल अचानक रद्द करण्यात आल्यामुळे, शुक्रवारी शेकडो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील सकाळच्या वेळेतील वातानुकूलित लोकल अचानक रद्द करण्यात आल्यामुळे, शुक्रवारी शेकडो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. लोकल रद्द झाल्याची कोणतीच माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने न दिल्यामुळे प्रवाशांनी माध्यमांकडे तक्रार दाखल केली. अखेर देखभाल-दुरुस्तीसाठी लोकल रद्द केल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.१० वाजून २२ मिनिटांनी सुटणारी विरार-चर्चगेट वातानुकूलितलोकल शुक्रवारी अचानक रद्द करण्यात आली. लोकल रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली. यातच प्रशासनाकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने, प्रवाशांच्या संतापात आणखी भर पडली.देशातील पहिल्या वातानुकूलित लोकलला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद लाभत आहे. नाताळच्या मुहूर्तावर एसी लोकल सुरू झाली. सद्यस्थितीत विरार-चर्चगेट मार्गावर एसी लोकल धावत आहे. प्रथम दर्जापेक्षा अधिक भाडे असलेल्या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द करताना, किमान एक दिवस आधी प्रवाशांना माहिती देण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी या वेळी केली.देखभाल-दुरुस्तीसाठी निर्णयलोकल देखभाल-दुरुस्तीच्या कारणास्तव वातानुकूलित लोकलच्या जागी साधी लोकल चालविण्यात आली. सोमवारी १८ जूनपासून वातानुकूलित लोकल वेळापत्रकाप्रमाणे धावेल.- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे.

टॅग्स :लोकलमुंबई लोकल