Join us  

उन्हाळ्यात एसी लोकल ऑनडिमांड; १ ते ६ मे दरम्यान ९ लाख १६ हजार ९३ प्रवाशांनी केला प्रवास

By सचिन लुंगसे | Published: May 07, 2024 5:37 PM

पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या ९६ फे-या चालविल्या जात असून, उन्हाळ्यामुळे या लोकलमधून प्रवास करणा-या प्रवाशांचा आकडा वाढत आहे

मुंबई : घाम काढणा-या मे महिन्यात ठंडा ठंडा कूल कूल राहण्यासाठी मुंबईकरांकडून एसी गाड्यांना अधिकाधिक पसंती दर्शविली जात असून, त्यानुसार पश्चिम रेल्वे मार्गावर धावणा-या एसी लोकलच्या प्रवाशी संख्या वाढत आहे. या वाढत्या प्रवाशांनी गेल्या दिवसांत ६ दिवसांत १ लाख ६० हजार ६४५ तिकिट काढले असून, गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत हा आकडा ३० टक्क्यांनी अधिक आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या ९६ फे-या चालविल्या जात असून, उन्हाळ्यामुळे या लोकलमधून प्रवास करणा-या प्रवाशांचा आकडा वाढत आहे. १ ते ६ मे दरम्यान ९ लाख १६ हजार ९३ प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला आहे.

मे / तिकिट / पास / एकूण तिकिट / प्रवासी१ / २३१०३ / १७२४ / २४८२७ / १२९४८०२ / २७५५९ / ३४५७ / ३१०१६ / २२९९३७३ / २९२९० / १५२० / ३०८१० / १२२६७९४ / २१८६५ / ८३३ / २२६९८ / ७५१५४५ / १७७३४ / १५४४ / १९२७८ / १११६२०६ / २८२७९ / ३७३७ / ३२०१६ / २४७२२३एकूण / १४७८३० / १२८१५ / १६०६४५ / ९१६०९३

६ मे रोजी ३२ हजार १६ एवढी तिकिट विक्री झाली असून, २ लाख ४७ हजार २२३ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

१ ते ६ मे दरम्यान १ लाख ६० हजार ६४५ एवढी तिकिट विक्री झाली असून, ९ लाख १६ हजार ९३ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

एप्रिल ते मे दरम्यायान ९ लाख ५२ हजार ५१३ एवढी तिकिट विक्री झाली असून, ४६ लाख ३७ हजार ४०१ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

टॅग्स :मुंबई लोकल