Join us

वीज बिलाबाबत ‘बेस्ट’ सारवासारव

By admin | Updated: November 4, 2015 02:56 IST

बेस्टची वीज बिले तयार करणाऱ्या कंपनीकडून बिलाचा डाटा करप्ट झाल्याने बेस्टतर्फे सप्टेंबर महिन्यात अंदाजे विज बिले पाठविल्याने ग्राहकांनी बेस्टकडे तक्रारींचा पाऊस पाडला

मुंबई : बेस्टची वीज बिले तयार करणाऱ्या कंपनीकडून बिलाचा डाटा करप्ट झाल्याने बेस्टतर्फे सप्टेंबर महिन्यात अंदाजे विज बिले पाठविल्याने ग्राहकांनी बेस्टकडे तक्रारींचा पाऊस पाडला. यानंतर आॅक्टोबर महिन्याचेही वीज बिल अधिक आल्याने ग्राहकांनी बेस्टकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. पण आॅक्टोबर महिन्यात अधिक वीज वापरल्याने नागरिकांना अधिक विज बिल आले असल्याची सारवासारव बेस्टने केली आहे.बेस्टने १ एप्रिल २0१५ मध्ये सुधारित वीज दर लागू केले. त्यानुसार ३00 युनिट आणि ५00 युनिटचा वापर करणाऱ्या विज ग्राहकांना अधिक वीज बिल येत आहेत. सुधारित टॅरिफनुसार वीज दर वाढले असल्याचे बेस्टकडून कळविण्यात आले आहे. वीज बिलाबाबत ग्राहकांना तक्रारी असल्यास त्यांनी विभागीय कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन बेस्टने केले आहे. (प्रतिनिधी)