Join us  

शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी सुमारे ६६ टक्के सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी सुमारे ६६ टक्के सूट देणारे महाकृषी ऊर्जा अभियान यशस्वी करण्यात महावितरणच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी सुमारे ६६ टक्के सूट देणारे महाकृषी ऊर्जा अभियान यशस्वी करण्यात महावितरणच्या महिला कर्मचारी, समाजातील सर्वच महिलांची भूमिका महत्त्वाची आहे, असे महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण म्हणाल्या.

महावितरणच्या एचएसबीसी येथील कार्यालयात आयोजित महिला दिनाच्या निमित्ताने पुष्पा चव्हाण बोलत होत्या. त्या म्हणाल्या, महिलांनी कोणतेही काम प्रामाणिकपणे, चिकाटीने केल्यास यश हे मिळतेच. प्रत्येक महिलेने आपल्या संपर्कातील शेतकऱ्यांना या योजनेचे महत्त्व सांगावे. त्यांना या योजनेत सहभागी करून घ्यावे.

प्रत्येक कुटुंबाचा आणि एकूण मानवी समाजाचा महिला या अविभाज्य भाग आहेत. चांगले शिक्षण घेतल्याने आज सर्वच क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. हे अत्यंत सकारात्मक चित्र आहे. या सर्व महिलांच्या निर्णयाचा व मतांचा अत्यंत सकारात्मक परिणाम त्यांच्या कुटुंबावर, समाजावर होत असतो. त्यामुळे शासनाची योजना यशस्वी करण्यात महिलांनीही आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.