Join us  

मुंबई विमानतळावरून ५ कोटी २८ लाख लोकांनी केला प्रवास; गेल्या आर्थिक वर्षातील उच्चांकी नोंद

By मनोज गडनीस | Published: April 22, 2024 5:26 PM

मार्च अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ५ कोटी २८ लाख लोकांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने कळवली आहे.

मनोज गडनीस, मुंबई : मार्च अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ५ कोटी २८ लाख लोकांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने कळवली आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ तब्बल १६ टक्के अधिक आहे. त्या आधीच्या वर्षी ४ कोटी ३९ लाख लोकांनी मुंबई विमानतळावरून प्रवास केला होता. 

या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरून विमानांच्या फेऱ्यांत देखील १२ टक्क्यांची वाढ होत एकूण ३ लाख २४ हजार ९७२ विमान फेऱ्यांची नोंद झाली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावर बाहेरून एकूण २ कोटी ६० लाख प्रवासी दाखल झाले तर २ कोटी ६७ लाख लोकांनी मुंबईतून प्रयाण केले. गेल्यावर्षी २५ नोव्हेंबर या एका दिवशी सर्वाधिक म्हणजे १ लाख ६७ हजार १३२ प्रवासी मुंबई विमानतळ प्रशासनाने हाताळले. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे या कालावधीमध्ये एकूण ४ कोटी ७ लाख बॅगा (सामान) विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी हाताळल्या.

टॅग्स :मुंबईविमानतळ