मुंबई : आरेमध्ये मेट्रो कार शेड उभारण्यावरून अलीकडेच खूप वादंग माजले असताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मोडत असलेल्या आरे कॉलनीत आता कोणतेही बांधकाम करू नका, असा महत्त्वपूर्ण आदेश राष्ट्रीय हरित लवादाने नुकताच दिला आहे. याबाबतची पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होणार आहे. तोपर्यंत मुंबई महापालिकेने बफर झोनमध्ये मोडत असलेल्या आरे कॉलनीत कोणत्याही नव्या बांधकामांना ना हरकत प्रमाणपत्र जारी करू नये; तसेच येथे कोणतीही अनधिकृत बांधकामे झाली असल्यास ती तत्काळ पाडावीत, असेही लवादाने आदेशात नमूद केले आहे.यासंदर्भात मुंबई महानगरपालिका, आरे दुग्ध वसाहतीचे संचालक आणि मुख्य वन अधिकारी यांनी या ठिकाणी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना काम बंद करण्याविषयी नोटीस जारी करावी, असेही लवादाने आदेशात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
‘आरे’मध्ये नवीन बांधकामे नको
By admin | Updated: August 28, 2015 02:39 IST