Join us

जळगावहून हरवलेल्या आजीला पोलिसांनी घरी पोहोचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 05:35 IST

जळगावहून हरवलेल्या आजीला घरी पोहोचविण्यास मुंबई पोलिसांना यश आले. वसुबाई ननावरे असे आजीचे नाव असून, त्या घरी परतल्याने कुटुंबीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

मुंबई : जळगावहून हरवलेल्या आजीला घरी पोहोचविण्यास मुंबई पोलिसांना यश आले. वसुबाई ननावरे असे आजीचे नाव असून, त्या घरी परतल्याने कुटुंबीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडे अकरा वाजता ननावरे यांना सातबावडी पोलीस चौकीकडे एका बस वाहकाने पोलिसांच्या ताब्यात दिले. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पत्ता त्यांना विचारला. मुंबईचा पत्ता त्यांना नीट सांगता येत नव्हता. तेव्हा त्यांनी त्यांचे नाव आणि गावचा पत्ता पोलिसांना दिला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप बडे यांनी जळगावमधील पोलीस पाटलाकडे याची माहिती दिली. पोलीस पाटील त्यांच्या घरी गेले आणि मुंबईत राहणारा त्यांचा मुलगा किसन याचा मोबाइल नंबर मिळवला. किसन मेघवाडी पोलीस ठाण्यात पोहोचला. तेथे त्याची आईसोबत भेट झाली़