Join us  

रेल्वेच्या आॅनलाइन आरक्षणासाठी ‘आधार लिंक’ करावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 6:08 AM

रेल्वेच्या आॅनलाइन तिकीट आरक्षणामधील गैरप्रकारांना आळा घालून एजंटांना चाप लावण्यासाठी आता वापरकर्त्याला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दाखल झाला असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

मुंबई   - रेल्वेच्या आॅनलाइन तिकीट आरक्षणामधील गैरप्रकारांना आळा घालून एजंटांना चाप लावण्यासाठी आता वापरकर्त्याला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दाखल झाला असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.सॉफ्टवेअरच्या माध्यमाने आॅनलाइन तिकिटांमध्ये फेरफार करणाऱ्या एजंटला रेल्वे सुरक्षा दलाने मुंबईत ३ मे रोजी अटक केली आहे. त्याच्या चौकशीसाठी आणि प्रत्यक्षात आरोपीची कार्यपद्धती (मोडस आॅपरेन्टन्सी) जाणून घेण्यासाठी रेल्वे सूचना प्रणाली केंद्राच्या (क्रिस) दिल्लीस्थित वरिष्ठ अधिकारी सोमवारी मुंबईत आले होते. त्या वेळी संबंधित रेल्वे अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर ८ कलमी सूचनांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यामध्ये आधार लिंक करण्याच्या सूचनेचाही प्रस्ताव आहे.क्रिस मुख्यालयातील अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आरोपीची कार्यपद्धती समजून घेऊन तयार केलेला प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर केला आहे.आयपी अ‍ॅड्रेस नोंद करावे लागणारच्आयआरसीटीसी या संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित करताना ‘आधार कार्ड लिंक’ची सूचनाही करण्यात आली आहे.च्त्याचबरोबर एका आयपी अ‍ॅड्रेसवरून (संगणकाची सांकेतिक ओळख) किमान तिकिटांची मर्यादा ठेवण्याचीही सूचना आहे.च्व्यावसायिक आयपी अ‍ॅड्रेस असल्यास त्याची नोंद आयआरसीटीसीकडे करण्यात यावी, यानंतर संबंधित व्यावसायिक आयपी अ‍ॅड्रेसला अनेक तिकिटे आरक्षित करण्याची मुभा मिळेल.च्संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित करताना ‘कॅप’ अधिक सुरक्षित करण्यासाठी सूचनादेखील प्रस्तावित आहे.

टॅग्स :भारतीय रेल्वेआधार कार्डबातम्या