आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 21:07 IST2025-12-02T21:06:44+5:302025-12-02T21:07:12+5:30
Uddhav Thackeray News: ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचे आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
Uddhav Thackeray News: विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गळती ठाकरेंसाठी मोठे आव्हान असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे जवळपास स्पष्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेल्या काही दिवसांत ठाकरे गटातील इन्कमिंग वाढताना दिसत असून, एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील एक बड्या नेत्याने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले.
ठाण्यातील शिवसेनेचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. आगामी काळात ठाणे महानगर पालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे. अशातच रामचंद्र पिंगुळकर यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला.
दगाबाज भाजपाला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना
दगाबाज भाजपाला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना केली. सध्या सत्तेसाठी सगळी लाचारी चालली आहे. हवेत प्रदूषण आहे, तसे राजकारणात आहे. काँग्रेस बरोबर गेले. उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा करून धुळफेक करण्याचे काम केले. अजित पवार निधी देत नाही, अशी अनेक कारणे ठाण्याची लोक देतात. मला शिव्या घालत होते. पण आजही ठाण्यात शिवसेनेची वट आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. भगव्यावर कोणतही चित्र छापू नका, तो शिवरायांचा आहे, तो पवित्र आहे, तो तसाच फडकला पाहिजे. मशाल घेऊन पुढे चला, मशालीच्या तेजाने सर्व जळमट जळून खाक होईल. इतरांनी जे केले ते तुम्ही करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.