Join us  

माजी विद्यार्थी करणार ९.४ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 6:36 AM

मुंबई : आयआयटी बॉम्बेमध्ये १९९२ साली उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनी आयआयटीमध्ये एकत्र भेटले. या भेटीदरम्यान आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी ९.४ कोटी रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

मुंबई : आयआयटी बॉम्बेमध्ये १९९२ साली उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनी आयआयटीमध्ये एकत्र भेटले. या भेटीदरम्यान आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी ९.४ कोटी रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. १९९२च्या बॅचचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने देश - विदेशातील माजी विद्यार्थी आयआयटी कॅम्पसमध्ये एकत्र जमले होते. या वेळी त्यांनी आठवणींना उजाळा दिला.आयआयटी बॉम्बेमध्ये माजी विद्यार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात १९९२च्या बॅचबरोबरच आयआयटीच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. आयआयटीमधून १९६२ साली पहिली बॅच उत्तीर्ण होऊन बाहेर पडली. या बॅचला आता ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत़ यानिमित्ताने या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आयआयटीकडून प्रतिष्ठित पुरस्काराने माजी विद्यार्थ्यांना गौरविण्यात येते. आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाºया विद्यार्थ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार माजी विद्यार्थी मिलिंद म्हैसकर आणि साकेत गाडीया यांना देण्यात आला.आयआयटी बॉम्बेमधील माजी विद्यार्थी वारस म्हणून दरवर्षी आयआयटी बॉम्बेला काही निधी देतात. १९९२च्या बॅचने दिलेल्या पैशांतून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. हॉस्टेसमध्ये सुधारणा, विद्यार्थ्यांचे समुपदेशन असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.>विद्यार्थ्यांचा मोठा वाटाआयआयटी बॉम्बेचे संचालक प्रा. देवांग खख्खर यांनी सांगितले, संशोधन आणि विकास क्षेत्रात आयआयटी बॉम्बे ही शैक्षणिक संस्था अग्रणी आहे. माजी विद्यार्थ्यांचा आयआयटीच्या विकासात मोठा वाटा आहे. जगातील टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये आयआयटी बॉम्बेचे नाव पहिल्या स्थानी यावे हे आमचे स्वप्न आहे.