Join us  

राज्यात दिवसभरात ८२ हजार २६६ रुग्ण तर ८६४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:07 AM

मुंबई : राज्यात शनिवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. यात दिवसभरात ८२ हजार ...

मुंबई : राज्यात शनिवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. यात दिवसभरात ८२ हजार २६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आतापर्यत एकूण ४३ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात ५३ हजार ६०५ रुग्ण तर ८६४ मृत्यूंची नोंद झाली आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.०३ टक्के असून मृत्युदर १.४९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९१ लाख ९४ हजार ३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३७ लाख ५० हजार ५०२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २८ हजार ४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५० लाख ५३ हजार ३३६ झाली असून बळींचा एकूण आकडा ७५ हजार २७७ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ८६४ मृत्युंपैकी ३९९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर २२६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २३९ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ८६४ मृत्युंमध्ये मुंबई ६२, ठाणे १५, ठाणे मनपा १०, नवी मुंबई मनपा ११, उल्हासनगर मनपा १, भिवंडी निजामपूर मनपा १, वसई विरार मनपा १, रायगड १३, पनवेल मनपा १५, नाशिक २६, नाशिक मनपा ५५, अहमदनगर ३६, अहमदनगर मनपा ११, धुळे ३, धुळे मनपा ४, जळगाव १३, जळगाव मनपा २, नंदुरबार ३३, पुणे ६, पुणे मनपा १३, सोलापूर ३०, सोलापूर मनपा १५, सातारा ३४, कोल्हापूर २४, कोल्हापूर मनपा १, सांगली २०, सांगली मिरज कुपवाड मनपा ४, सिंधुदुर्ग ४, रत्नागिरी १२, औरंगाबाद ९०, औरंगाबाद मनपा ६, जालना ८, हिंगोली २, परभणी १२, परभणी मनपा ९, लातूर ४, लातूर मनपा ६, उस्मानाबाद २६, बीड २०, नांदेड १०, नांदेड मनपा ११, अकोला ६, अकोला मनपा ४, अमरावती १५, अमरावती मनपा ५, यवतमाळ २८, वाशिम १३, नागपूर १७, नागपूर मनपा ४९, वर्धा १७, भंडारा २, गोंदिया ४, चंद्रपूर १०, चंद्रपूर मनपा ९, गडचिरोली ६ इ. रुग्णांचा समावेश आहे.

वयोगटनिहाय रुग्णसंख्या

वयोगट रुग्णसंख्या

नवजात बालक ते १० १५१२९५

११ ते २० ३४३४६१

२१ ते ३० ८७९४२७

३१ ते ४० ११०२९०६

४१ ते ५० ८९७७११

५१ ते ६० ७४२६४६

६१ ते ७० ५१०९७३

७१ ते ८० २४६२३९

८१ ते ९० ७०१७३

९१ ते १०० ९८६३

१०१ ते ११० ७८३