Join us  

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात ८० टक्के कपात, विद्यापीठाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 1:33 AM

मुंबई विद्यापीठाने आगामी परीक्षांच्या शुल्कात तब्बल ६० ते ८० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आॅनलाइन अ‍ॅसेसमेंट प्रक्रियेवेळी गेल्या सत्रात विद्यापीठाने केलेल्या परीक्षा शुल्कवाढीवर सर्वच विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आगामी परीक्षांच्या शुल्कात तब्बल ६० ते ८० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आॅनलाइन अ‍ॅसेसमेंट प्रक्रियेवेळी गेल्या सत्रात विद्यापीठाने केलेल्या परीक्षा शुल्कवाढीवर सर्वच विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यात प्रक्रियेत झालेल्या गोंधळानंतर विद्यापीठाच्या विद्वत परिषद आणि व्यवस्थापन मंडळाने घेतलेल्या बैठकीत शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.पदवी परीक्षेसाठी एका विषयालाही हजार रुपये अदा करणा-या विद्यार्थ्याच्या शुल्कात ८० टक्के कपात होईल. त्यामुळे हजार रुपयांऐवजी विद्यार्थ्याला २०० रुपये अदा करावे लागतील. तर दोन विषय घेऊन पदवी परीक्षा देणाºयाला ६० टक्के सवलत मिळाली आहे. त्यामुळे आता हजारऐवजी केवळ ४०० रुपये द्यावे लागतील. सोबतच पदव्युत्तर परीक्षेसाठीच्या एका विषयासाठीही प्रशासनाने ७३ टक्के कपात केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना एका विषयासाठी दीड हजारऐवजी केवळ ४०० रुपये भरावे लागतील. तर दोन विषयांसाठी ५३ टक्क्यांनी कपात केल्याने ७०० रुपये शुल्क भरावे लागेल.५ टक्क्यांनी वाढ!विद्यापीठाने एकीकडे परीक्षा शुल्कात कपात केली असली, तरी पुढील शैक्षणिक वर्षापासून दरवर्षी ५ टक्क्यांनी शुल्कवाढ करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला आहे. त्यामुळे आता जरी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला, तरी भविष्यात शुल्कवाढीचा बोजा विद्यार्थ्यांवर पडणार आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ