Join us  

फायनान्स कंपनीकडून गुंतवणुकीच्या नावाखाली ४५ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 1:37 AM

यात आतापर्यंत ४५ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुंबई : गुंतवणुकीच्या नावाखाली मालाडमधील फायनान्स कंपनीने ४५ लाख ७६ हजार रुपयांना गंडविल्याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सुनील नागपाडा (५०) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सप्टेंबर २०१२ पासून मालाडमध्ये असलेल्या रामजेनिया लिजिंग अ‍ॅण्ड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक जयंत शेट्टी, गणेश आणि हरिश शेट्टी आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी ही फसवणूक केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ४५ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये शेकडो जणांची फसवणूक केल्याचा संशयही वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत, अधिक तपास सुरू केला आहे.