Join us  

कुंटणखान्यातून ८ मुलींची सुटका

By admin | Published: March 30, 2015 12:37 AM

जिवे मारण्याची धमकी देत अनेक अल्पवयीन मुलींना जबरदस्ती वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या ग्रॅन्ट रोड परिसरातील एका कुंटणखान्यावर

मुंबई : जिवे मारण्याची धमकी देत अनेक अल्पवयीन मुलींना जबरदस्ती वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या ग्रॅन्ट रोड परिसरातील एका कुंटणखान्यावर शनिवारी समाजसेवा शाखेने छापा घातला. यामध्ये पोलिसांनी ८ मुलींची सुटका करत दोघांना अटक केली आहे.ग्रँट रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून इतर राज्यातून अनेक मुली वेश्या व्यवसायात आणल्या जात असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी शामराव विठ्ठल मार्गावरील रेले बिल्ंिडगच्या खोली नंबर तीनमध्ये छापा घातला. यावेळी या अधिकाऱ्यांना याठिकाणी ८ मुली आढळल्या. यातील काही मुली अल्पवयीन असल्याची माहिती समाजसेवा शाखेने दिली. तर काही मुलींना कुंटणखाना चालकानेच लग्नाचे आमिष दाखवत मुंबईत आणून त्यांच्यावर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. काही मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यासाठी मारहाण आणि सिगारेटचे चटके देखील देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. समाजसेवा शाखा अधिकाऱ्यांनी या मुलींची सुटका करत हा कुंटणखाना चालवणाऱ्या ५० वर्षीय महिलेसह २८ वर्षीय तरुणाला अटक करत डी. बी. मार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. (प्रतिनिधी)