वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० कोटा पद्धत रद्द; मंत्री अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:39 AM2020-09-09T01:39:45+5:302020-09-09T06:56:44+5:30

आता ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’

70:30 quota system for medical admissions canceled; Minister Amit Deshmukh's announcement in the Assembly | वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० कोटा पद्धत रद्द; मंत्री अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा

वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० कोटा पद्धत रद्द; मंत्री अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा

Next

मुंबई : राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये ७० टक्के प्रादेशिक कोटा आणि ३० टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता ही पद्धत रद्द करण्यात आली असल्याने ‘वन महाराष्ट्र, वन’ मेरिट अशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया असेल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत केली.

यापूर्वी उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे तीन प्रादेशिक विभाग करण्यात आलेले होते, ज्या प्रादेशिक विभागातून उमेदवार १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेला असेल त्या उमेदवारांसाठी त्यांच्या संबंधित प्रादेशिक विभागातील महाविद्यालयामध्ये ७० टक्के जागा राखीव असत. तसेच ३० टक्के जागा ह्या संपूर्ण 

दोन्ही बाजूंनी बाकेवाजवून स्वागत

या पद्धतीमुळे उच्च गुणवत्ता असूनही तेथील उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे त्यांच्या नाराजी होती. आज हा अन्याय दूर झाला आहे, असे देशमुख यांनी सांगितले. त्यांच्या घोषणेचे दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.

Web Title: 70:30 quota system for medical admissions canceled; Minister Amit Deshmukh's announcement in the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.