राजू काळे - भाईंदर
पालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार ऑक्टोबर 2क्14 मध्ये डेंग्यूचे एकूण 303 संशयित रुग्ण आढळून आले असून त्यातील 6 जणांना डेंग्यूची लागण झाल्याने आरोग्य विभागच सिरियस असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उघडय़ावर पाणी साठविण्याची मानसिकता व अस्वच्छतेमुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या डासांमुळे मलेरिया, डेंग्यू असे आजार डोके वर काढत आहेत. या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत बहुउद्देशीय कर्मचारी, विशेष वैद्यकीय पथकाची नियुक्ती, वैद्यकीय शिबिरांसह भित्तीपत्रके व हॅण्डबिलांद्वारे जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, शहरात नवीन बांधकामांच्या ठिकाणांसह गलिच्छ वस्ती व इतर ठिकाणी साठणारे पाणी, औद्योगिक वसाहत व बाजार परिसरातील अस्वच्छतेमुळे तेथे डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात होत आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी सांगितले की, डासांमुळे होणारे आजार आटोक्यात आणण्यासाठी पालिकेची 9 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 1 उपकेंद्र, 1 फिरता दवाखाना व मीरा रोड येथील रुणालयात विशेष व्यवस्था व औषधोपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी कुठेही पाणी साठवू नये व परिसरात स्वच्छता ठेवावी. यासाठी वैद्यकीय विभागातील कर्मचा:यांकडून सतत सव्र्हे करण्यात येत आहे. पुढील काळात जनजागृतीच्या कार्यक्रमासह डास व अळीनाशक औषध फवारणीसाठी अतिरिक्त कर्मचा:यांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे.
वैद्यकीय विभागाचे सातत्याने सर्वेक्षण
4जानेवारी ते ऑक्टोबर 2क्14 दरम्यान मलेरियाचे एकूण 549 संशयित रुग्ण आढळून आले असून त्यातील 165 रुग्णांना मलेरियाची लागण तर एकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच कालावधीत 1 हजार 46 रुग्णांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले. यातील 7क् रुग्णांच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 15 रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
4केवळ ऑक्टोबर महिन्यात मलेरियाचे 86 व डेंग्यूचे 3क्3 संशयित रुग्ण आढळून आले असून त्यातील 17 रुग्णांना मलेरियाची तर 6 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.