Join us  

सात तस्करांकडून ६ किलो ड्रग्ज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) मुंबई, मुंब्रा आणि पुण्यात छापा टाकून सात तस्करांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) मुंबई, मुंब्रा आणि पुण्यात छापा टाकून सात तस्करांना अटक केली. त्याच्याकडून रोख रकमेसह विविध प्रकारचे एकूण ६ किलो ड्रग्ज जप्त केले.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने मुंब्रा कौसा येथील साहिलला अटक करून १.७५ किलो एमडी, ३.९ किलो इफेड्रीन जप्त केले. तर इब्राहिम झागिर व गुजरातच्या मोरबीतून परमारला अटक केली. त्याच्याकडून ३०० ग्रॅम एमडी जप्त केले, तसेच यातील मुख्य सूत्रधार नदीम शेख याला पुण्यातील खराडीतून अटक केली. त्याच्याकडून ४५ ग्रॅम चरस जप्त केले.

दुसरी कारवाई गोरेगावातील कसबा रेस्टॉरंटजवळ करण्यात आली. या ठिकाणी छापा टाकून पथकाने रेहान शेखला पकडले व त्याच्याकडून ६२ ग्रॅम एमडी जप्त केले. हा गेल्या ५ वर्षांपासून तो ड्रग्ज सप्लाय करत होता. अंधेरी व वांद्रे येथे कारवाई करून पूर्वीच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या जयप्रकाश व विजय कुमार यांना अटक करत एमडी १०३ .८ ग्रॅम जप्त केले. २८ जूनला एनसीबीने केलेल्या कारवाईतील ते फरारी आरोपी होते. त्यावेळी १०३.८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले व एका महिलेसह तिघांना अटक केली होती.